Share

महिलेची अश्लील बदनामी; आमदार विलास भुमरेंचे निकटवर्तीय भाऊसाहेब तरमळेला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी

महिला पत्रकाराची फेसबुकवर अश्लील बदनामी केल्याप्रकरणी आमदार विलास भुमरेंचे निकटवर्तीय तथा राष्ट्रवादीचा नेता भाऊसाहेब तरमळे याला अटक. २ दिवसांची पोलीस कोठडी.

Published On: 

Bhausaheb Tarmale Arrested Chhatrapati Sambhajinagar Police

छत्रपती संभाजीनगर: फेसबुकवर महिला पत्रकार आणि त्यांच्या पतीबद्दल अत्यंत अश्लील, लैंगिक स्वरूपाची आणि बदनामीकारक टिप्पणी केल्याप्रकरणी आमदार विलास भुमरेंचे निकटवर्तीय तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता भाऊसाहेब सुभाष तरमळे (Bhausaheb Tarmale) याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर १ ऑक्टोबर २०२६ त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पत्रकार यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती. या कायदेशीर लढ्यात त्यांच्या वतीने वकील जी. टी. वायभासे यांनी न्यायालयात कामकाज पाहिले. पोलिसांच्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अक्षय विठ्ठलराव मुळे याच्या फेसबुक पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये भाऊसाहेब तरमळे याने वानखडे दांपत्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील कमेंट्स केल्याचा आरोप आहे. या कमेंट्समध्ये पत्रकाराच्या स्त्रीत्त्वाचा अपमान करणारी भाषा वापरण्यात आली होती. तसेच, त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा खोटा आरोप करून सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या अत्यंत आक्षेपार्ह कमेंटला अक्षय मुळे याने ‘स्माईल’ रिॲक्शन देऊन गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याचाही आरोप आहे.

तक्रारदार महिलेने काही दिवसांपूर्वी बोकुडजळगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत एक बातमी प्रसिद्ध केली होती. याच बातमीचा राग मनात धरून तरमळे आणि त्याच्या साथीदाराने संगनमत करून ही बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी भाऊसाहेब तरमळे (रा. बोकुडजळगाव, ता. पैठण) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता असून, तो खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. दुसरा फरार आरोपी अक्षय मुळे (रा. ढोरकीन, ता. पैठण) याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी सुरुवातीला २४ सप्टेंबर रोजी पैठण पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीवरून ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR No. 003) नोंदवण्यात आला. मात्र, घटनास्थळ (क्रांती चौक) हे पैठण पोलिसांच्या हद्दीबाहेर असल्याने, अधिकारक्षेत्राच्या (Jurisdiction) कारणास्तव हा गुन्हा पुढील तपासासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात BNS चे कलम ७५(१)(iv), ७८(२), ७९, ३५१(२), ३५२, ३५६ आणि ३(५), तसेच आयटी ॲक्टचे कलम ६७, ६७(अ) आणि महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

फेसबुकवर महिला पत्रकार आणि त्यांच्या पतीबद्दल अश्लील व बदनामीकारक टिप्पणी केल्याप्रकरणी आमदार विलास भुमरेंचे निकटवर्तीय भाऊसाहेब तरमळे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही