छत्रपती संभाजीनगर, (किरण काळे पाटील) ९ ऑक्टोबर: जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील डोंगरगाव फाटा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत एका कारसह २ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या सिल्लोड (ई विभाग) कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव शिवारात करण्यात आलेल्या या कारवाईत सुनील रामभाऊ वाघ (रा. माणिकनगर-भवन, ता. सिल्लोड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो कार (एमएच १६ एटी १५४२) आणि त्यात लपवलेल्या ‘रॉयल गोवा व्हिस्की’च्या १८० मिली क्षमतेच्या ४८० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी (Goa Liquor Smuggling) असलेल्या या दारूची किंमत १ लाख ५ हजार ६०० रुपये, तर वाहनाची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक अभिनव बालुरे आणि उप-अधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ई विभागाचे निरीक्षक एन. आर. मुंजाळ, दुय्यम निरीक्षक ए. टी. बिडकर, व्ही. जी. साळुंके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अनंत शेंदरकर आणि जवान कृष्णा पाटील, राहुल बनकर, अमित नवगिरे, प्रेम सुरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
पुढील तपास निरीक्षक एन. आर. मुंजाळ करत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘निधनानंतरही सत्य बदलत नाही’, तनुश्रीला मिळाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची साथ!
- तुकाराम मुंढे आणि शाळकरी मुलाचा संवाद: ‘शाळेतला वडापाव पुन्हा सुरू करा’, मुलाच्या प्रश्नावर मुंढेंचं भन्नाट उत्तर
- आधार कार्डच्या गैरवापराला बसेल आळा; घरबसल्या ‘असा’ करा तुमचा आधार क्रमांक लॉक
Quick Answers
ही कारवाई जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील डोंगरगाव फाटा (डोंगरगाव शिवार) येथे करण्यात आली.
या कारवाईत कारसह एकूण २ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुनील रामभाऊ वाघ याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो कार आणि 'रॉयल गोवा व्हिस्की'च्या १८० मिली क्षमतेच्या ४८० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८००२३३९९९९ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









