“तो टिकला असता तर…”; पाकिस्तानविरुद्धच्या ४८ धावांच्या पराभवानंतर तिलक वर्माकडून शाहबाज अहमदवर खापर

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार तिलक वर्माने शाहबाज अहमदवर अप्रत्यक्षरीत्या खापर फोडत तो आणखी दोन षटके टिकला असता तर सामना जिंकलो असतो असे म्हटले आहे.

Published On: 

Tilak Varma talking about Shahbaz Ahmed after loss to Pakistan Shaheens

प्रतिनिधी, 23 नोव्हेंबर: २२ नोव्हेंबर रोजी दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ च्या गट ‘ब’ मधील सामन्यात भारत ‘अ’ संघाला पाकिस्तान शाहींन्सकडून ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार तिलक वर्माने झळकावलेल्या शानदार शतकानंतरही भारताला ३१४ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही.

या सामन्यात भारताचा डाव ४९.१ षटकांत २६५ धावांवर आटोपला. तिलकने १४९ चेंडूत १०० धावांची झुंज दिली, तर अभिषेक शर्माने अवघ्या ४२ चेंडूत ७० धावांची स्फोटक खेळी केली. शाहबाज अहमदनेही ४९ चेंडूत ५६ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले, मात्र त्यांचे हे प्रयत्न भारताला विजयाच्या पार नेण्यासाठी अपुरे पडले.

शाहबाज अहमद महत्त्वाच्या टप्प्यावर बाद झाल्याने भारताने विजयाची संधी गमावली, असे तिलक वर्माला वाटते. शाहबाज आणि तिलकने १०८ चेंडूत ११२ धावांची भागीदारी करत सामना पाकिस्तानच्या हातून हिरावून घेण्याची चिन्हे निर्माण केली होती. मात्र, ४३.३ षटकांत भारताची धावसंख्या २४१/७ असताना शाहबाज बाद झाला आणि सामन्याचे पारडे पूर्णपणे फिरले. अखेर भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

NDTV च्या वृत्तानुसार, सामन्यानंतरच्या सादरीकरणात तिलक म्हणाला, “अभिषेकने ज्या प्रकारे सुरुवात केली आणि त्यानंतर शाहबाजने माझ्यासोबत जी भागीदारी केली, ती खूप महत्त्वाची होती. पण दुर्दैवाने, जेव्हा आम्हाला धावगती वाढवायची होती, तेव्हा शाहबाज बाद झाला. तो आणखी दोन षटके किंवा त्याहून थोडा काळ टिकून राहिला असता, तर मी सामना संपवू शकलो असतो.”

तिलकने यावेळी अभिषेकच्या आक्रमक सुरुवातीचे कौतुक केले, मात्र त्याने शाहबाजवर अप्रत्यक्षपणे खापर फोडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शतक झळकावण्यापेक्षा सामना जिंकणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे तिलकने स्पष्ट केले. तो म्हणाला, “माझ्यासाठी सामना जिंकणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. जर आपण सामना जिंकलो नाही, तर ती माझ्यासाठी सर्वोत्तम गोष्ट नाही.”

इतर फलंदाजांकडून अधिक साथीची अपेक्षा होती, असेही त्याने मान्य केले, मात्र स्वतःच्या आणि संघाच्या प्रयत्नांवर त्याने समाधान व्यक्त केले. “मला नेहमीच खेळ शक्य तितक्या शेवटपर्यंत न्यायचा असतो. आज माझा तोच प्रयत्न होता. जर इतर कोणत्याही फलंदाजाने मला साथ दिली असती, तर मी सामना संपवू शकलो असतो. पण ती माझी भूमिका आहे. जर तुम्ही संघाचे कर्णधार असाल, तर तुम्ही तो भार आणि जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मला तसे करायला मनापासून आवडते. शेवटी, देव दयाळू आहे आणि त्याने मला या धावा दिल्या आहेत,” असे तिलक पुढे म्हणाला.

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही