प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: ‘शाळेतला वडापाव बंद झालाय, माझ्या मित्रांना तो पुन्हा सुरू हवाय, तुम्ही काय सांगाल?’ असा थेट प्रश्न एका शाळकरी मुलाने विचारला, तोही थेट राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना. एरवी आपल्या कडक कारवाईमुळे भल्याभल्यांना घाम फोडणारे मुंढे या निरागस प्रश्नावर हसले आणि त्यांनी अतिशय सोप्या शब्दांत त्या मुलाला आरोग्याचा कानमंत्र दिला.
गेल्या काही महिन्यांपासून मुंढेंनी राज्यात धडक कारवाईची मोहीम उघडली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून, शाळांच्या कँटीनमध्ये आणि ५० मीटरच्या परिसरात वडापाव, समोसा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या जंक फूडवर त्यांनी पूर्ण बंदी घातली आहे. याच निर्णयाबाबत एका विद्यार्थ्याने त्यांना गाठलं आणि वडापाव सुरू करण्याची गळ घातली.
Tukaram Mundhe Viral Video
मुलाचा प्रश्न ऐकून मुंढेंनी अतिशय नम्रपणे त्याला समजावलं. “वडापाव नाही खाल्ला तर आपलं आयुष्य काही थांबणार नाही. उलट चांगलं खाल्लं तर वाढ चांगली होईल,” असं ते म्हणाले. त्यांनी फॅटी ॲसिड आणि तळलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला. यातून कोणतेही पोषक घटक मिळत नाहीत, त्यामुळे प्रथिनांनी (प्रोटीन) युक्त आहार घेण्यावर त्यांनी भर दिला.
वडापाव पाठोपाठ मुलाने चायनीज फूडबद्दलही विचारणा केली. त्यावरही मुंढेंनी अतिशय स्पष्ट शब्दांत चायनीज पदार्थांमधील हानिकारक रंग आणि केमिकल्सचे धोके समजावून सांगितले. चवीपेक्षा आरोग्याला महत्त्व द्या आणि ‘हेल्दी’ राहा, असा मोलाचा सल्ला त्यांनी या चिमुकल्याला दिला. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या संवादाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आधार कार्डच्या गैरवापराला बसेल आळा; घरबसल्या ‘असा’ करा तुमचा आधार क्रमांक लॉक
- गृहकर्जातून लवकर मुक्ती मिळवायचीय? EMI आणि पैशांच्या बचतीसाठी वापरा या सोप्या ट्रिक्स
- बाळासाहेब चिडले, मग नाना थेट मातोश्रीवर पोहोचले; संजय राऊतांनी सांगितला खास किस्सा
Quick Answers
शाळेतला वडापाव बंद झाला असून मित्रांसाठी तो पुन्हा सुरू व्हावा, याबद्दल आपले काय सांगणे आहे, असा थेट प्रश्न एका शाळकरी मुलाने तुकाराम मुंढे यांना विचारला.
शाळांच्या कँटीनमध्ये आणि ५० मीटरच्या परिसरात वडापाव, समोसा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या जंक फूडवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
वडापाव नाही खाल्ला तर आयुष्य थांबत नाही आणि उलट चांगले खाल्ल्यास वाढ चांगली होते, असे मुंढेंनी सांगितले. तसेच त्यांनी तळलेले पदार्थ व फॅटी ॲसिड टाळून प्रथिनांनी (प्रोटीन) युक्त आहार घेण्याचा सल्ला दिला.
चायनीज पदार्थांमध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्स असतात असे सांगून मुंढेंनी त्याचे धोके स्पष्ट केले, तसेच चवीपेक्षा आरोग्याला महत्त्व देण्याचा सल्ला दिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









