प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुःखद बातमीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी नानांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांवर भाष्य केले.
संजय राऊत यांनी यावेळी एक खास किस्सा सांगितला. पु. ल. देशपांडे यांच्यावर बाळासाहेबांनी केलेल्या टीकेवर नाना पाटेकर यांनी भाष्य केले होते. त्यामुळे बाळासाहेब त्यांच्यावर चिडले होते. मात्र, या वादानंतर दुसऱ्याच दिवशी नाना थेट मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी बाळासाहेबांना सांगितले की, पितृतुल्य म्हणून तुम्हाला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
राऊत म्हणाले की, नाना पाटेकर हे स्वतःला शिवसैनिक मानायचे आणि ते माहीममध्ये राहायचे. त्यांचा सर्वच राजकीय पक्षांमध्ये वावर होता आणि ते व्यासपीठावरून राजकीय नेत्यांवर स्पष्टपणे टीकाही करायचे. बॉलिवूडमध्ये मराठी माणसाचा स्वाभिमान टिकवून ठेवणारे, मराठी बाणा जागृत करणारे आणि एक अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून राऊत यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नानांनी मोठे समाजकार्य केले, तसेच अनेक संस्थांना पडद्यामागून शांतपणे मदत केल्याचेही राऊत यांनी सांगितले. राऊत यांनी आजारपणातील आठवण सांगताना म्हटले की, नाना एकमेव व्यक्ती होते जे त्यांना एक दिवसाआड फोन करून आधार, मार्गदर्शन आणि आहाराविषयी सल्ला देत असत. राऊत यांनी नानांना त्यांच्या जीवनसंघर्षावर पुस्तक लिहिण्याची विनंती केली होती, त्यावर आपण टाचणे काढून ठेवली असून पुस्तक नक्की प्रकाशित करू, असे नाना म्हणाले होते. तसेच त्यांनी राऊत यांच्याकडे ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचीही मागणी केली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वीच सीजेपी नेत्यांना धक्का; दिल्ली पोलिसांकडून जुलैतील संसद मार्च हिंसाचाराची चौकशी
- १२०० एकर जमीन प्रकरणी सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, अंजली दमानियांच्या आरोपांवर पलटवार
- ३३ वर्षांपूर्वी ‘खलनायक’साठी नाना पाटेकर होते पहिली पसंती; संजय दत्तची कशी लागली वर्णी?
Quick Answers
पु. ल. देशपांडे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर नाना पाटेकर यांनी भाष्य केले होते. त्यामुळे बाळासाहेब त्यांच्यावर चिडले होते.
वादानंतर दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर पोहोचून नाना पाटेकर यांनी बाळासाहेबांना सांगितले की, पितृतुल्य म्हणून तुम्हाला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
नाना पाटेकर यांनी 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून मोठे समाजकार्य केले.
संजय राऊत यांच्या आजारपणात नाना पाटेकर त्यांना एक दिवसाआड फोन करून आधार, मार्गदर्शन आणि आहाराविषयी सल्ला देत असत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









