प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: खासदार सुप्रिया सुळे यांच्या जावयाच्या कंपनीला १२०० एकर सरकारी जमीन देण्याच्या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दमानिया यांच्या या आरोपांवर आता सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना त्यांनी यावर पलटवार केला.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई काय करतो? हा त्याचा प्रश्न मी त्याच्यावरती कसं बोलणार?” तत्पूर्वी, दमानिया यांनी या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केवळ दोन आठवड्यांत दोन जीआर (GR) निघाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.
१२०० एकर सरकारी जमिनीच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात निविदा का टाळली आणि स्पर्धा का होऊ दिली नाही, असा सवाल दमानिया यांनी विचारला आहे. तसेच, जून महिन्यात महाऊर्जामार्फत पीपीपी (PPP) तत्त्वावर ग्रीन एनर्जी पार्कसाठी जमीन देण्याचा निर्णय झालेला असताना, अवघ्या तीन महिन्यांत सप्टेंबरमध्ये तीच जमीन एकाच खासगी कंपनीला का देण्यात आली, असा दावाही दमानिया यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे बोलत असलेल्या पक्षाच्या या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित होते. यावेळी सुळे यांनी महिला आरक्षणाचा मुद्दाही मांडला. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच महिलांना राजकारणात आरक्षण मिळाले आणि त्या सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष व महापौर पदावर विराजमान होऊ शकल्या, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. मात्र, महिला आरक्षणाच्या निर्णयाची आतापर्यंत अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिवसातून काही क्षण मनमोकळेपणाने हसा, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मिळतील अनेक फायदे
- नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानाचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…
- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन; ‘तिरंगा’च्या सेटवरील भाजीचा किस्सा चर्चेत
Quick Answers
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझा जावई काय करतो? हा त्याचा प्रश्न मी त्याच्यावरती कसं बोलणार?"
१२०० एकर सरकारी जमिनीच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात निविदा का टाळली आणि स्पर्धा का होऊ दिली नाही, असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला. तसेच, दोन आठवड्यांत दोन जीआर निघाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत, अवघ्या तीन महिन्यांत जमीन एकाच खासगी कंपनीला का देण्यात आली, असा दावाही त्यांनी केला.
सुप्रिया सुळे बोलत असलेल्या पक्षाच्या या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








