प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: स्वतःचे घर खरेदी करताना अनेक जण बँकांकडून २० ते २५ वर्षांच्या कालावधीसाठी लाखोंचे गृहकर्ज घेतात. मात्र, काही सोप्या ट्रिक्सचा वापर केल्यास या दीर्घकालीन कर्जातून लवकर मुक्ती मिळवता येते आणि मोठ्या प्रमाणावर पैशांची बचतही करता येते.
उदाहरणार्थ, जर एखाद्याने २० वर्षांसाठी ३० लाखांचे कर्ज घेतले असेल, तर त्याला दरमहा अंदाजे २६,०३५ रुपये हप्ता (EMI) भरावा लागू शकतो. हे २० वर्षांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडण्यासाठी दरवर्षी नियमित हप्त्यांव्यतिरिक्त एक अतिरिक्त ईएमआय भरणे हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे.
कर्ज आणखी लवकर संपवण्यासाठी ईएमआय भरण्याचे नियोजन करता येते. पहिल्या वर्षी एक अतिरिक्त ईएमआय, दुसऱ्या वर्षी ईएमआयच्या दीडपट रक्कम, पुढील वर्षी दोन अतिरिक्त ईएमआय आणि तिसऱ्या वर्षात तीन अतिरिक्त ईएमआय भरण्याचा पर्याय वापरता येतो. तसेच, नोकरीत पगार वाढल्यास त्याप्रमाणात ईएमआयच्या रकमेतही वाढ करावी, ज्यामुळे कर्ज लवकर फिटण्यास मदत होते.
याव्यतिरिक्त, दरवर्षी मिळणाऱ्या बोनसच्या रकमेचा वापर करून कर्जाची मुद्दल कमी करून घेता येते. इन्कम टॅक्स रिफंड किंवा इतर कोणत्याही मार्गाने अतिरिक्त पैसे हाती आल्यास त्यातून लोन प्रीपेमेंट केल्यास गृहकर्जाचा बोजा लवकर कमी होतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिवसातून काही क्षण मनमोकळेपणाने हसा, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मिळतील अनेक फायदे
- नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानाचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…
- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन; ‘तिरंगा’च्या सेटवरील भाजीचा किस्सा चर्चेत
Quick Answers
२० वर्षांसाठी ३० लाखांचे गृहकर्ज घेतल्यास दरमहा अंदाजे २६,०३५ रुपये ईएमआय भरावा लागू शकतो.
२० वर्षांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडण्यासाठी दरवर्षी नियमित हप्त्यांव्यतिरिक्त एक अतिरिक्त ईएमआय भरणे हा सोपा मार्ग आहे.
दरवर्षी मिळणाऱ्या बोनसच्या रकमेचा वापर करून मुद्दल कमी करता येते. तसेच, इन्कम टॅक्स रिफंड किंवा अतिरिक्त पैसे मिळाल्यास लोन प्रीपेमेंट करून गृहकर्जाचा बोजा लवकर कमी करता येतो.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









