आवडतं हॉटेल, सिनेमा ते पुढची बदली; तुकाराम मुंढेंची ‘या’ प्रश्नांवर रोखठोक उत्तरे

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत आवडते हॉटेल, सिनेमा, प्रामाणिक राजकारणी आणि त्यांच्या पुढील बदलीबाबत विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

Published On: 

Tukaram Mundhe on Nana Patekar

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: कडक शिस्त आणि धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून चर्चेत आहेत. आपल्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल २५ वेळा बदल्यांना सामोरे गेलेल्या मुंढे यांनी नुकतीच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींवर दिलखुलास उत्तरे दिली आहेत. आवडता सिनेमा, हॉटेल आणि पुढची बदली यांसारख्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत रोखठोक उत्तरे दिली.

एका रॅपिड-फायर मुलाखतीत त्यांना आवडत्या हॉटेलबाबत विचारले असता त्यांनी थेट ‘नो’ असे उत्तर दिले. आतापर्यंत भेटलेले सर्वात प्रामाणिक राजकारणी कोण? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, देशात असे अनेक लोक आहेत, त्यामुळे केवळ एका व्यक्तीचे नाव सांगणे कठीण आहे. तर ‘मुकद्दर का सिकंदर’ हा आपला आवडता सिनेमा असून, आवडता हिरो नेहमी बदलत राहतो, असेही त्यांनी सांगितले.

प्रशासकीय सेवेत सर्वाधिक बदल्यांचा अनुभव असलेल्या मुंढे यांना त्यांच्या ‘पुढच्या बदली’बाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘हे कधीही होऊ शकते आणि त्यासाठी तयार राहावे लागते’, असे उत्तर त्यांनी दिले. तुमचा वारसा (लेगसी) काय असेल? यावर बोलताना मुंढे यांनी स्पष्ट केले की, ‘माझी कोणतीही लेगसी नाहीये. जनतेसाठी जे योग्य आहे ते करणं ही माझी जबाबदारी आहे, असं मी समजतो.’

सध्या एफडीए आयुक्तपदाची धुरा सांभाळताना मुंढे यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब आणि अन्नपदार्थ निर्मिती केंद्रांमधील भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर ते कठोर कारवाई करत आहेत. शिवाय, नागरिकांना अशा प्रकारच्या तक्रारी सहज करता याव्यात यासाठी त्यांनी विशेष हेल्पलाइन सुविधाही सुरू केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही