आसाममध्ये एक्स्प्रेस ट्रेनला भीषण अपघात; दिगारू स्थानकाजवळ डबे रुळावरून घसरले, ७ जण जखमी

आसाममध्ये दिगारू स्थानकाजवळ कोआ-सैरांग एक्स्प्रेस रुळावरून घसरून अपघात झाला आहे. या घटनेत ७ प्रवासी जखमी झाले असून मदत व बचावकार्य सुरू आहे.

Published On: 

KOAA Sairang Express train derailed near Digaru railway station in Assam

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: आसाममध्ये एका एक्स्प्रेस ट्रेनला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोलकातावरून सैरांगच्या दिशेने जाणारी कोआ-सैरांग एक्स्प्रेस (१३१२५) दिगारू रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली.

आज सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी ही दुर्घटना घडल्याची पुष्टी नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी केली आहे. या अपघातात रेल्वेचे सहा डबे रुळावरून खाली घसरल्याची माहिती नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेकडून देण्यात आली आहे.

या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र सात प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. बचावकार्याला गती देण्यासाठी एक रिलीफ ट्रेनही पाठवण्यात येत आहे.

या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या उशिराने धावत असून काही रेल्वेगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र रेल्वे प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही