“दादा, आज तुझं नसणं चटका लावून जातं”, भाऊबीजेला सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी काळजाला भिडणारी पोस्ट

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतरची ही पहिलीच भाऊबीज असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर एक जुना व्हिडिओ शेअर करत अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.

Published On: 

Supriya Sule and Ajit Pawar old Bhaubeej celebration video

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: दिवाळीत लक्ष्मीपूजन, पाडवा आणि त्यानंतर येणारा भाऊबीजेचा सण बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज आली असली, तरी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मात्र हा दिवस वेदनादायी ठरला आहे. कारण, यंदाच्या भाऊबीजेला अजितदादा त्यांच्यासोबत नाहीत.

२८ जानेवारीला बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त आले होते. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि पक्षात दोन गट पडले. राजकीय मतभेदांमुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे पक्ष तसेच आघाड्या बदलल्या. राजकीय धोरणे वेगळी असली, तरी पवार कुटुंबातील आपुलकीचे आणि बहीण-भावाच्या नात्यातील प्रेमाचे बंध कायम होते.

आज भाऊबीजेच्या दिवशी अजितदादांची प्रकर्षाने उणीव भासत असल्याने सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर भाऊबीजेचा एक जुना व्हिडिओ शेअर केला असून, त्यात त्या अजित पवारांना ओवाळताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आजूबाजूला पवार कुटुंबीय आणि पार्थ पवार हेदेखील उपस्थित असल्याचे दिसते.

या व्हिडिओसोबत लिहिलेल्या भावूक पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, “दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात”

आपल्या भावना व्यक्त करताना त्या पुढे म्हणतात, “दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही