विलीनीकरणाच्या चर्चेत मोठी घडामोड! अजित पवार गटाचे २० आमदार शरद पवारांच्या भेटीला?

अजित पवार गटाचे २० आमदार आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. या आमदारांनी दिवाळीच्या निमित्ताने भेटीची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Published On: 

Parth Pawar meets Sharad Pawar

मुंबई, 11 नोव्हेंबर: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार गटाचे जवळपास २० आमदार आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’वर भेट घेण्याची शक्यता आहे. या आमदारांनी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भेटीसाठी उत्सुक असलेल्या या २० जणांमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांचा समावेश आहे. वेळ मागणारे हे बहुतांश आमदार मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र भागातील आहेत. दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा भेट घेणे आणि शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करणे, असे कारण या आमदारांकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतरच पडद्यामागे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना वेग आला. याच नाजूक राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आमदारांनी थेट शरद पवारांची वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आता शरद पवार या आमदारांना भेटीसाठी वेळ देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आमदारांची ही केवळ एक सदिच्छा भेट ठरणार की यातून महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही