बिडकीन | किरण काळे पाटील: हद्दीत विनापरवाना अवैध वाळू आणि मुरुमाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर (Sand Smuggling) बिडकीन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एक टिप्पर आणि दोन हायवा अशी तीन वाहने पकडण्यात आली आहेत. या धडक मोहिमेत एकूण १२ ब्रास गौण खनिज (वाळू व मुरुम) आणि वाहनांसह तब्बल ३७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन चालकांसह अज्ञात मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली मोठी कारवाई २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चितेगाव-बाभूळगाव परिसरात करण्यात आली. सपोनि शेळके यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार अमोल मगर आणि पो.अं. ढवळे हे गस्तीवर असताना, त्यांना बाभूळगाव येथून दोन हायवा वाहने मुरुम घेऊन सह्याद्री पार्ककडे येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पंचांसह बाभूळगाव येथे सापळा रचला. पहाटे २:५५ वाजेच्या सुमारास एम.एच. २० डी.ई. ४१७९ आणि एम.एच. १४ एम.टी. ७०६९ क्रमांकाचे दोन टाटा हायवा येताना दिसले. पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता त्यात १० ब्रास मुरुम आढळून आला. या वाहनांचे चालक अरुण कृष्णा राठोड (वय २९, रा. जांभळीवाडी, ता. पैठण) आणि किरण शिवाजी पवार (वय २४, रा. गेवराई तांडा, ता. पैठण) यांच्याकडे रॉयल्टी नसल्याचे उघड झाले. या कारवाईत दोन हायवा आणि २० हजार रुपयांचा मुरुम असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई याच्या आदल्या दिवशी, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी शेकटा शिवार भागात झाली. शेंदूरवादा येथून शेकटाकडे एक विनानंबरचे पिवळ्या रंगाचे टिप्पर (एम.एच. २० जी.झेड. ८१२२) वाळू घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अंमलदार सचिन आगलावे आणि पो.हे.कॉ. राजू चव्हाण यांनी खंडोबा मंदिराजवळ सापळा रचून हे वाहन पकडले. तपासणीत वाहनात २ ब्रास वाळू आढळली. चालक कार्तिक सोमिनाथ नवले (वय २३, रा. लांझी, ता. गंगापूर) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. या कारवाईत ७ लाख रुपयांचे वाहन आणि १० हजार रुपयांची वाळू असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळू आणि मुरुमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी, दोन्ही घटनांमध्ये बिडकीन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) सह गौण खनिज अधिनियम २१ (१), (२), (३), (४), (५) अन्वये तीनही चालक आणि वाहनांच्या अज्ञात मालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- वाळूमाफियांचा सुळसुळाट! गुन्हे शाखेचा छापा अन् २७ लाखांचा मुद्देमाल जप्त; सपोनि भरत मोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
- उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर पाटील यांना पुन्हा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार
- अकोल्यात शिंदे गटाचे गटनेते सागर भारुका खंडणी प्रकरणात अटकेत; भाजपने गोवल्याचा आरोप
Quick Answers
या कारवाईत १२ ब्रास गौण खनिजासह (वाळू व मुरुम) आणि वाहनांसह एकूण ३७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत चालक अरुण कृष्णा राठोड आणि किरण शिवाजी पवार यांच्याकडून दोन हायवा वाहने व १० ब्रास मुरुम असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेकटा शिवारात चालक कार्तिक सोमिनाथ नवले याच्या ताब्यातील टिप्परमधून २ ब्रास वाळू आढळली आणि वाळू वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे वाहन व वाळूसह ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीनही चालक आणि वाहनांच्या अज्ञात मालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) सह गौण खनिज अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








