पैठण | किरण काळे पाटील: सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ३, पाचोड (ता. पैठण) येथील उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर पाटील (Rajendra Borkar) यांना अभियंता दिन २०२६ निमित्त छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाच्या वतीने ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण नियोजन आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याला छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता रूपा राऊळ, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डंबारे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य जिंतूरकर, महानगरपालिकेचे सिटी इंजिनिअर संजय कोंबडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक अभय कुमार आणि सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत उपस्थित होते.
राजेंद्र बोरकर पाटील यांच्या कार्याची यापूर्वीही अनेकदा शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. २०१८ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, तर २०१९ मध्ये हरित इमारत क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला होता. २०२२ मध्ये प्रादेशिक पातळीवर आणि २०२४ मध्ये राज्य स्तरावरील ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला होता.
सन २०२५ मध्ये शंभर दिवसीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत पाचोड उपविभागाने मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळवला होता. या कामगिरीबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. सलग मिळवलेल्या या पुरस्कारांच्या मालिकेमुळे बोरकर पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अकोल्यात शिंदे गटाचे गटनेते सागर भारुका खंडणी प्रकरणात अटकेत; भाजपने गोवल्याचा आरोप
- हार्दिकचा पत्ता पुन्हा कट, टीम इंडियात मराठमोळ्या शिलेदाराची थेट एन्ट्री
- विधानपरिषद निवडणूक: नागपूर पदवीधरमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका, अनिल सोले अपक्ष लढणार
Quick Answers
राजेंद्र बोरकर पाटील यांना अभियंता दिन २०२६ निमित्त छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाच्या वतीने ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण नियोजन आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला आहे.
२०२४ मध्ये तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांना राज्य स्तरावरील ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
सन २०२५ मध्ये शंभर दिवसीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत पाचोड उपविभागाने मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळवला होता, ज्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते बोरकर पाटील यांचा गौरव करण्यात आला होता.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








