Share

वाळूमाफियांचा सुळसुळाट! गुन्हे शाखेचा छापा अन् २७ लाखांचा मुद्देमाल जप्त; सपोनि भरत मोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून २७ लाख ५० हजार रुपयांची अवैध वाळू व दोन हायवा टिप्पर जप्त केले आहेत.

Published On: 

Illegal sand smuggling action by LCB in Paithan MIDC.

पैठण | किरण काळे पाटील: स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईसारवाडी फाटा येथे अवैध वाळू वाहतूक (Sand Smuggling) करणारे दोन हायवा टिप्पर पकडले आहेत. २ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत १० ब्रास वाळूसह २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बाहेरून आलेल्या पथकाने थेट कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर आणि कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरील ईसारवाडी फाट्यावर सापळा रचला होता. कृत्रिम अडथळा निर्माण करून वाहनांची तपासणी केली असता, वाळूने भरलेले दोन टाटा हायवा टिप्पर आढळून आले. पोलिसांनी दोन्ही वाहने आणि चालकांना ताब्यात घेतले असून, एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गौण खनिज कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत एमएच-२० डीई-८६८६ या टिप्परवरील चालक सोमनाथ अशोक आदमने (वय ३३, रा. मुंगी, ता. शेवगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १२ लाख रुपयांचा टिप्पर आणि २५ हजार रुपयांची ५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तसेच एमएच-२० जीसी-८१८२ या टिप्परवरील चालक सचिन अंकुश वानखेडे (वय ३०, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याच्याकडून १५ लाख रुपयांचे वाहन आणि २५ हजार रुपयांची ५ ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पैठण व एमआयडीसी हद्दीत रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याच्या नागरिकांच्या सतत तक्रारी आहेत. २८ सप्टेंबरपासून ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव सुट्टीवर असल्याचा गैरफायदा वाळू तस्करांकडून घेतला जात असल्याची स्थानिक पातळीवर चर्चा आहे. एलसीबीने कारवाई करून दोन हायवा पकडल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या अवैध वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले का, असा सवाल उपस्थित होत असून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भरत उत्तम मोरे (API Bharat More) यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी त्यांना कार्यालयात बोलावून जाब विचारल्याची चर्चा परिसरात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, उपनिरीक्षक लहु घोडे, विजय धुमाळ, महेश बिरुटे, सनि खरात आणि संदिप कोळगे यांच्या पथकाने केली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरील ईसारवाडी फाटा येथे सापळा रचून ही कारवाई केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही