Share

रणबीरच्या ‘रामायण’वर मुकेश खन्ना संतापले; म्हणाले, “श्रीरामांना सलमान, रजनीकांत बनवलंय”

मुकेश खन्ना यांनी रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटावर टीका केली असून, श्रीरामांना सलमान खान आणि रजनीकांत यांच्यासारखे ॲक्शन हिरो बनवल्याचा आरोप केला आहे.

Published On: 

Mukesh Khanna on Ramayana Movie

प्रतिनिधी, 1 ऑक्टोबर: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाच्या ट्रेलरमधील ॲक्शन सीन्सवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘महाभारत’ मालिकेत भीष्म पितामहांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी या चित्रपटातील भगवान श्रीरामांच्या चित्रणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत.

‘बॉलिवूड नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी चित्रपटाच्या ट्रेलरवर सडकून टीका केली. चित्रपटात श्रीरामांना आधुनिक ॲक्शन हिरोसारखे दाखवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमने प्रभू श्रीराम यांना एक ॲक्शन मॅन, एक ॲक्शन सुपरस्टार बनवलं असून त्यांची ‘मर्यादा पुरुषोत्तम’ ही प्रतिष्ठा हिरावून घेतल्याचा आरोप खन्ना यांनी केला आहे. ट्रेलरमध्ये श्रीराम झाडावर चढून बाण सोडताना दिसतात, यावरही त्यांनी आक्षेप घेतला.

Mukesh Khanna on Ramayana Movie

मुकेश खन्ना यांनी पुढे स्पष्ट केले की, “फक्त स्पेशल इफेक्ट्समुळे चित्रपट भव्यदिव्य होत नाही, कारण भारतीय परंपरेत रामांचे भावनिक महत्त्व आहे. श्रीराम हे धनुर्धर होते, ते देवाचा अवतार आहेत. पण या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या लढाईच्या दृश्यांसारखी दृश्ये मी कधीही पाहिली नाहीत. मी रामायण खूप वाचलं आहे, रामलीला पाहिली आहे. या लोकांनी श्रीराम यांना सलमान खान, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत बनवलं आहे.”

चित्रपटातील श्रीरामांना ‘मॅन ऑफ ॲक्शन’ किंवा ‘क्लिंट ईस्टवुड’सारखे दाखवण्यात आल्याची टिप्पणीही त्यांनी केली. ‘रामायण’चा जागतिक स्तरावर विचार केला जात असला, तरी भारतात श्रीरामांची प्रतिमा आणि धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन चित्रण व्हायला हवे. परदेशातील प्रेक्षक याची तुलना ‘स्टार वॉर्स’सारख्या सिनेमांशी करू शकतील, मात्र भारतीयांसाठी रामायणाचा विषय श्रद्धेशी जोडलेला आहे, असे परखड मत त्यांनी मांडले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

चित्रपटात भगवान श्रीरामांना आधुनिक ॲक्शन हिरो किंवा 'मॅन ऑफ ॲक्शन'सारखे दाखवल्याबद्दल आणि त्यांची 'मर्यादा पुरुषोत्तम' ही प्रतिष्ठा हिरावून घेतल्याचा आरोप मुकेश खन्ना यांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही