Share

कुंभमेळा लुटण्यासाठी आलेला फडणवीसांचा एजेंट गिरीश! काँग्रेसचा घणाघात

नाशिक कुंभमेळा वर्कऑर्डर घोटाळा प्रकरणात काँग्रेसने गिरीश महाजन आणि फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली.

Published On: 

Congress targets Girish Mahajan over Nashik Kumbh Mela

कुंभमेळा घोटाळ्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या दोन नातलगांना अटक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे.

दरम्यान हा गुन्हा अक्षम्य आहे, नातेवाईक असला तरी गय करणार नाही, अशी प्रतिक्रिया यावर गिरीश महाजन यांनी दिली दिली होती. या घोटाळ्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ‘X’ आणि Instagram हँडलवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Congress targets Girish Mahajan over Nashik Kumbh Mela

या पोस्टमध्ये काँग्रेसने राज्य सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. “कुंभमेळा लुटण्यासाठी आलेला फडणवीसांचा एजेंट गिरीश!” अशा शब्दांत महाजन यांचा उल्लेख केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, काँग्रेसने कुंभमेळ्याशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसची नेमकी टीका काय?

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, महाराष्ट्र काँग्रेसने कुंभमेळ्याच्या कामांशी संबंधित बनावट कार्यादेश (वर्क ऑर्डर्स), कंत्राटे आणि आर्थिक अनियमिततेबाबत आरोप केले आहेत.

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक आणि सार्वजनिक महत्त्व असलेल्या कार्यक्रमाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा विरोधी पक्षाने केला असून, यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाजन हे सरकारचे ‘एजंट’ म्हणून काम करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. मात्र, या आरोपांना पुष्टी देणारा कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही