रोहित पवार प्रसिद्धीसाठी हपापलेले, त्यांच्यात अजितदादांची जागा घेण्याची पात्रता नाही; गिरीश महाजनांचा पलटवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणाऱ्या रोहित पवारांवर मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार करत ते प्रसिद्धीसाठी हपापलेले नेते असल्याची टीका केली.

Published On: 

Girish Mahajan criticizing Rohit Pawar over allegations against Devendra Fadnavis.

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: आमदार रोहित पवार हे प्रसिद्धीसाठी हपापलेले नेते असून, त्यांच्यात अजितदादांची जागा घेण्याची पात्रता नाही, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे. अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना वाचवणारा ‘मफलर मॅन’ दुसरा तिसरा कुणी नसून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला होता, ज्यावर महाजन यांनी ही तीव्र प्रतिक्रिया दिली.

अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूला सुमारे नऊ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोषींना पाठीशी घालणाऱ्या ‘मफलर मॅन’चे नाव उघड करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला आणि तेच मफलर मॅन असल्याचा दावा केला. त्यांच्या या विधानानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, रोहित पवार यांनी इतके बालिश आणि छिचोरे विधान करावे, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अजितदादांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे, यासाठीच त्यांनी हे विधान केल्याचे दिसते. हा माणूस प्रसिद्धीसाठी इतका हपापलेला आहे की, काय बोलावे आणि कोणाबद्दल बोलावे हेही त्याला कळत नाही.

व्हीआरएस कंपनीची विमाने सर्वच राजकारणी वापरतात, स्वतः रोहित पवारही वापरत होते, मग यामध्ये त्यांचाही हात आहे का? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी दाखवलेला फोटो २०२४ मधील असून, आता कोणी कोणाच्या लग्नात जात नाही का? असेही ते म्हणाले. सुनेत्रा पवार यांनी त्यांना वारंवार अशी विधाने करू नका असा सल्ला दिला होता, तरीही यांची खोड जात नसल्याचा टोला महाजन यांनी लगावला.

केवळ हेडलाईनमध्ये झळकण्यासाठी आणि टीव्हीवर बघितले जावे यासाठी ते अशी फालतू विधाने करत आहेत. त्यांच्या मनात दादांविषयी कोणतेही प्रेम नसून त्यांना फक्त प्रसिद्धीसाठी आपले नाव रोज टीव्हीवर आणायचे आहे. त्यांना अजितदादांची जागा घेण्याची घाई झाली आहे, मात्र त्यांची तेवढी पात्रता नाही, अशी बोचरी टीका महाजन यांनी केली. दादांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू असून ती सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या माणसावर इतका घाणेरडा आरोप करताना भान असायला हवे, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही