मुंबई, 17 नोव्हेंबर: नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून वातावरणात बदल जाणवू लागला असून, सकाळी हलकी थंडी वाजू लागली आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात. या कोरड्या हवेमुळे अनेकांच्या टाचांना भेगा पडतात, ज्यामुळे तळवे दुखण्याची समस्या उद्भवू शकते. मात्र, काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून फाटलेल्या टाचा लवकर भरून येण्यास मदत मिळू शकते.
फाटलेल्या टाचा मऊ करण्यासाठी कोमट पाण्यात सैंधव मीठ आणि एका लिंबाचा रस मिसळून द्रावण तयार करा. यामुळे भेगांमध्ये साचलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच, अत्यंत कोरड्या आणि तडतडलेल्या टाचांसाठी खोबरेल तेलाचा वापर फायदेशीर ठरतो. पाय स्वच्छ धुवून झोपण्यापूर्वी कोमट खोबरेल तेलाने तळव्यांना मालिश करावी आणि त्यानंतर झोपताना मोजे घालावेत. यामुळे पायात लवकर फरक दिसून येतो.
याशिवाय, शिया बटर वितळवून त्यात एक ते दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि ते मलईसारखे दिसेपर्यंत फेटा. रात्रीच्या वेळी हे मिश्रण टाचांना लावून सुती मोजे घालावेत. जर तुम्ही हे मिश्रण दिवसा लावत असाल, तर ते किमान एक तास तसेच ठेवावे आणि त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवून घ्यावेत.
पेट्रोलियम जेलीचा वापर हा अत्यंत साधा आणि प्रभावी उपाय आहे. आंघोळीनंतर लगेच आणि रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर जेली लावून मोजे घातल्यास, कडक त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच, स्वच्छ पायांवर ताज्या कोरफडीचा गर लावून हलक्या हाताने मालिश केल्यासही त्वचेला आराम मिळतो. रात्रभर हा गर तसाच ठेवून सकाळी कोमट पाण्याने पाय धुवावेत. कोरफडीमध्ये असलेले ॲसेमॅनन, ग्लुकोमॅनन आणि जिवाणूविरोधी गुणधर्मांमुळे त्वचेला खूप फायदा होतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- अब्दुल कादिरना मारलेले सिक्स लक्षात राहिले, पण कसोटीतली ‘ती’ खेळी दुर्लक्षित; पहिल्या पाकिस्तान दौऱ्याबाबत सचिनने व्यक्त केली खंत
- बीसीसीआयच्या अंडर-१९ क्रिकेटपटू नंदिनी राठोडची आत्महत्या; दोन तरुणांवर छळवणुकीचा कुटुंबाचा आरोप
- बांगलादेश क्रिकेटमध्ये व्हॅसलीनचा वापर करून चेंडूशी छेडछाड; देशांतर्गत स्पर्धेत गंभीर आरोप








