हिवाळ्यात त्वचा मऊ आणि मुलायम कशी ठेवाल? निरोगी त्वचेसाठी लक्षात ठेवा या सोप्या टिप्स

हिवाळ्यात कोरड्या आणि खडबडीत त्वचेपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन, मॉइश्चरायझरचा वापर आणि योग्य हायड्रेशन आवश्यक आहे. जाणून घ्या त्वचेच्या काळजीच्या टिप्स.

Published On: 

Winter skin care tips for glowing and soft skin

मुंबई, 12 नोव्हेंबर: दिवाळीच्या सुमारास थंडीला सुरुवात होते. या दिवसांत तापमान आणि हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचेवर त्याचा थेट परिणाम दिसून येतो. हिवाळ्याच्या सुरुवातीला अनेकदा त्वचा कोरडी, निस्तेज आणि खडबडीत होऊ लागते. केवळ चेहराच नव्हे, तर हात आणि पायांवरही कोरडेपणा जाणवतो. तसेच भेगा पडणे आणि स्ट्रेच मार्क्सची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे या ऋतूत त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

थंडीत ऊन कमी असले तरी सूर्याच्या अतिनील किरणांचा (UV rays) त्वचेला धोका असतोच. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी असला तरी सनस्क्रीन लावणे टाळू नये. सनस्क्रीनप्रमाणेच त्वचेसाठी मॉइश्चरायझरचा वापर करणेही अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ज्यांना हिवाळ्यात मुरुमांचा त्रास सतावतो, त्यांच्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर फायदेशीर ठरतो.

वरिष्ठ काळजी घेऊनही त्वचेचा कोरडेपणा कमी होत नसेल, तर त्याचे मुख्य कारण शरीरातील पाण्याची कमतरता असू शकते. पाण्याच्या अभावामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न काढणे आणि चेहरा न धुणे यामुळे त्वचेचे नुकसान होते. यामुळे त्वचा खडबडीत होऊन त्वचेची छिद्रे (पोअर्स) मोठी आणि उघडी होऊ शकतात. निरोगी त्वचेसाठी झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढणे गरजेचे असून त्यासाठी ‘डबल क्लिन्झिंग’ पद्धतीचा वापर करता येऊ शकतो.

प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा प्रकार आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे डाग किंवा मुरुमांसारख्या समस्यांसाठी स्वतःच्या मनाने कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चुकीच्या उत्पादनांच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेला अनुकूल असलेलीच उत्पादने वापरावीत आणि समस्या वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही