Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या वातावरणात त्वचेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. थंडीमुळे त्वचा ( Skin Care ) अधिक कोरडी व्हायला लागते. तर अनेकांना टॅनिंगच्या समस्याला तोंड द्यावे लागते.

अशात या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा अवलंब करू शकतात. हिवाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी ( Skin Care )  घेण्यासाठी तुम्ही खालील घरगुती पद्धती वापरू शकतात.

बटाट्याचा रस ( Potato juice-Skin Care )

चेहऱ्याची ( Skin Care ) काळजी घेण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकतात. बटाट्यामध्ये विटामिन सी आणि विटामिन बी भरपूर प्रमाणात आढळून येते, जे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

यासाठी तुम्हाला बटाट्याचे पातळ काप करून घ्यावे लागतील. त्यानंतर या पातळ कपाच्या मदतीने तुम्हाला साधारण दहा मिनिट चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. त्यानंतर चेहरा सुकल्यानंतर तुम्हाला तो साधारण पाण्याने धुवावा लागेल.

साखर स्क्रब ( Sugar scrub-Skin Care )

चेहऱ्याचे ( Skin Care ) आरोग्य राखण्यासाठी साखर स्क्रब एक अत्यंत चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्हाला एका भांड्यात एक चमचा साखर एक चमचा लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्याला लावून साधारण पंधरा मिनिटं स्क्रब करावं लागेल. मग तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल.

हळद आणि दही ( Turmeric and curd-Skin Care )

दही आणि हळदीच्या मिश्रणाच्या मदतीने चेहरा ( Skin Care ) निरोगी राहू शकतो. यासाठी तुम्हाला एका भांड्यात एक चमचा हळदीमध्ये एक चमचा दही मिसळून घ्यावे लागेल.

त्यानंतर या मिश्रणात तुम्हाला बेसन आणि लिंबाचा रस आवश्यकतेनुसार मिक्स करून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्त्वाच्या बातम्या