Virat Kohli – पाकड्यांचा माज काही मोडेना; विराट कोहलीला म्हणाले ‘अब तेरी खैर नही’…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli । विराट कोहली हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहलीने नुकतेच त्याच्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील सर्वाधिक शतकांची बरोबरी केली होती. कोहलीने त्याच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

त्यानंतर मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने मास्टर ब्लास्टरला मागे टाकले. शतक पूर्ण केल्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli ) तेंडुलकरसमोर नतमस्तक झाला. कोहलीने 111 कसोटींमध्ये 49.29 च्या सरासरीने 8676 धावा, 280 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.67 च्या सरासरीने 13848 धावा आणि 107 T20 सामन्यांमध्ये 52.73 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत.

विराट कोहली जगातील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये आहे. विशेषत: पांढर्‍या चेंडूत त्याने मोठे विक्रम केले आहेत. विराट कोहलीची ( Virat Kohli ) विकेट घेणे अनेक गोलंदाजांची इच्छा असते पण पाकिस्तनाच्या वेगवान गोलंदाज जुनैद खानने विराटला इशारा ( धमकी ) देत विकेट मिळवली होती. जुनैदने तशी कबुली एका पॉडकास्ट वर दिली.

दंडे तो बहुत सारे उखाडे है मगर…. – जुनैद खान

जुनैद म्हणाला, “दंडे तो बहुत सारे उखाडे है मगर लोग जो याद करते है वो विराट कोहली कि विकेट” ( मी अनेक फलंदाजांच्या विकेट घेतल्या आहेत पण लोकांना विराट कोहलीची विकेट नेहमीच आठवते )

पुढे बोलताना जुनैद म्हणाला, “आम्ही अंडर-19 विश्वचषक सोबत खेळलो होतो, आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ही माझी पुनरागमन मालिका होती आणि मी पहिल्यांदाच भारताविरुद्ध खेळत होतो. पहिल्याच सामन्यात मला कोहलीची विकेट मिळाली होती. त्यानंतर त्याने मला सांगितले की असे पुन्हा होणार नाही.

पण मी दुस-या आणि तिसर्‍या सामन्यातहि त्याची विकेट घेतली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्याआधी नाश्त्याच्या टेबलावर मी त्याला म्हणालो ‘विराट आज आपकी खैर नहीं है ( विराट आज तुला सोडले जाणार नाही )’. युनूस खानही तिथे होता. तो ( युनूस ) म्हणाला आज पुन्हा त्याला आऊट कर. युनूस भाईने विराटचा ( Virat Kohli ) झेल घेतला,” जुनैद म्हणाला.

चेन्नईतील पहिल्या वनडेत जुनैदने कोहलीला शून्यावर क्लीन बोल्ड आउट केले. ईडन गार्डन्सवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली ( Virat Kohli ) पुन्हा जुनैदचा बळी ठरला होता. त्यानंतर त्याने कोहलीला इशारा देत त्याला युनूस खानकडे झेलबाद केले होते.

महत्वाच्या बातम्या