Gautam Gambhir | गुवाहाटी: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) ने शानदार खेळी खेळली होती. वर्षातील पहिल्याच सामन्यामध्ये त्याने शतक ठोकले आहे. विराटच्या या खेळीनंतर त्याची तुलना सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत करण्यात आली.
कोहलीचे शतक झाल्यानंतर कॉमेंट्री बॉक्सपासून ते सोशल मीडियापर्यंत त्याची तुलना सचिन तेंडुलकर सोबत करण्यात आली. विराट कोहली सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम लवकरच आपल्या नावावर करणार आहे, अशा चर्चा देखील या सामन्यानंतर सुरू झाल्या होत्या. मात्र, विराट कोहलीची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केल्यावर माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) संतापला आहे.
विराट कोहलीची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केल्यावर गौतम गंभीर (Gautam Gambhir) संतापला
कोहलीच्या खेळीनंतर गौतम गंभीर म्हणाला, “सचिनच्या काळामध्ये एवढ्या धावा करणे अधिक कठीण होते. कारण त्यावेळी क्षेत्ररक्षणाचे नियम फलंदाजांसाठी अनुकूल नव्हते. हे नियम आज खूप अनुकूल आहेत. भारताविरुद्ध श्रीलंकेने अत्यंत सोपी गोलंदाजी केली होती. त्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या 378 पर्यंतचा आकडा गाठू शकली आहे.
पुढे बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “ही गोलंदाजी अतिशय सामान्य होती. त्यामुळे टीम इंडियातील फलंदाजांना धावा करणं अधिक सोपं होतं. आणि भारतीय संघातील अव्वल तीन फलंदाजामध्ये इतक्या धावा करण्याची क्षमता आहे.”
विराट कोहलीने या शतकानंतर आपल्या कारकिर्दीतील 45 वे शतक पूर्ण केले आहे. यानंतर त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीचे हे सलग दुसरे एक दिवसीय शतक आहे. गेल्या महिन्यात त्यांनी बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये शतक झळकावले होते.
महत्वाच्या बातम्या
- Screen Guard | मोबाईलला स्क्रीन गार्ड बसवताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
- Bachhu Kadu Accident । मंत्रिमंडळ विस्तारा आधीच बच्चू कडूंचा अपघात; सोशल मीडियावर घातपाताची चर्चा
- Chitra Vagh & Urfi Javed | चित्रा वाघ उर्फी जावेद वादावर मोठी बातमी; भाजपकडून…
- Ramdas Kadam | “माझ्या मुलाचा अपघात घडवून त्याला…”; रामदास कदमांचा खळबळजनक दावा
- Health Care Tips | दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश