IND vs AUS T20I | अर्शदीप सिंगने सांगितला २० व्या षटकाचा थरार; ‘सूर्या भाईने ….

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs AUS T20I |  Arshdeep Singh | भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला आहे. २० व्या षटकात ऑस्ट्रेलिया संघाला १० धावांची गरज होती. अश्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh ) वर विश्वास दाखवला.

अर्शदीप सिंगने हि विश्वासला पात्र गोलंदाजी करत शेवटच्या षटकात केवळ ४ धावा देत मॅथ्यू वेडची विकेट घेतली. अर्शदीप सिंगने सुरवातीच्या तीन षटकांत ३७ धावा दिल्या होत्या. शेवटच्या षटकात त्याचा सामना धोकादायक मॅथ्यू वेड विरुद्ध होता. अर्शदीपने ( Arshdeep Singh ) २०व्या षटकातील पहिले दोन चेंडूत एकही धाव दिली नाही.

अर्शदीप सिंगच्या यशस्वी भेदक गोलंदाजीने भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सहा धावांनी विजय मिळवला. आणि भारताने मालिका 4-1 च्या फरकाने जिंकली.

२० व्या षटकाचा थरारा वर बोलतांना अर्शदीप ( Arshdeep Singh ) म्हणाला, ”सूर्यकुमार यादवने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे मी चांगली गोलंदाजी करू शकलो. मी खूप धावा दिल्या पण देवाने मला आणखी एक संधी दिली आणि सपोर्ट स्टाफने माझ्यावर विश्वास ठेवला. खरे सांगायचे तर, माझ्या मनात काहीही चालले नव्हते. सूर्याभाईने ( Suryakumar Yadav ) मला सांगितले की जे काही व्हायचे आहे ते होईल,” असे आर्शदीप ( Arshdeep Singh ) म्हणाला.

स्वतःच्या गोलंदाजीवर तो ( अर्शदीप ) म्हणाला, “खूप धडा शिकलो पण चुकांमधून परत येईन.” डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh ) टी-२० मध्ये डेथ ओव्हर्समध्ये एका वर्षाहून अधिक काळ संघर्ष करत होता.

विजयानंतर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) म्हणाला, “ही एक चांगली मालिका होती. ज्याप्रकारे संघाने त्यांचे कौशल्य दाखवले ते वाखाणण्याजोगे होते. मी संघाला सांगत असे “जे योग्य आहे ते करा आणि फक्त तुमच्या खेळाचा आनंद घ्या,” आणि त्यांनी तेच त्यांनी केले. त्यामुळे खूप आनंद झाला.”

पुढे बोलतांना सूर्या ( Suryakumar Yadav ) म्हणाला, खेळपट्टी संथ गोलंदाजांना मदत करत होती, जर वॉशिंग्टन सुंदर असला असता तर भारताने सहज विजय मिळवला असता.

श्रेयस अय्यरची शानदार खेळी 

श्रेयस अय्यरने आपल्या टी-२० कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. अय्यरने संघाकडून सर्वाधिक ५३ धावा केल्या. त्याने ३७ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार मारले.

भारताने बंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका ४-१ने जिंकली.

महत्वाच्या बातम्या