IND vs SL | कर्णधार रोहित शर्मा संघात करणार मोठा बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

IND vs SL | तिरुअनंतपुरम: आज भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय (ODI) मालिकेतील तिसरा म्हणजे शेवटचा सामना तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे खेळला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन सामने आपल्या नावावर केले आहे. टीम इंडियाने या मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे.

या सामन्यामध्ये संघाच्या गोलंदाजीफळीत बदल दिसू शकतो. कारण कर्णधार रोहित शर्माला गोलंदाजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या सामन्यामध्ये शमीच्या जागी वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंगला संधी मिळू शकते. युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते. तर, फलंदाजीमध्ये सलामीवीर इशान किशन आणि मधल्या फळीमध्ये सूर्यकुमार यादव यांना संधी मिळू शकते.

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेली ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला न्युझीलँडविरुद्ध एकदिवसीय सामने खेळायचे आहे. टीम इंडियाला पुढील 14 दिवसांमध्ये 50 षटकांचे 6 सामने खेळायचे आहे. त्यामुळे टीम इंडियात बदल होऊ शकतात.

आज होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक या खेळाडूंचा समावेश असू शकतो.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.