Maharashtra Kesari 2023 | महेंद्र गायकवाडला चितपट करत शिवराज राक्षेने मिळवली ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा

Maharashtra Kesari 2023 | पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ या मानाचा कुस्तीचा सामना आज पुण्यात पार पडला. या कुस्तीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला चितपट करत मानाची गदा मिळवली आहे. शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव करत ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला आहे.

या अंतिम सामन्याचं आयोजन हे स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी कोथरुड पुणे इथे करण्यात आलं होतं. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. तसेच या अंतिम सामन्याला राज्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती.

नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनला 8/2 असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा 6/4 असा पराभव केला होता.

दरम्यान, या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ब्रिजभूषण सिंह, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे  याला रोख 5 लाख रुपये, आणि महिंद्रा थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.