Weather Update | राज्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरणार, तर देशात ‘या’ ठिकाणी थंडीचा रेड अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या उत्तर भारतामध्ये चांगलाच गारठा वाढला आहे. तर देशातील इतर भागात वातावरणामध्ये (Weather) सातत्याने बदल होत आहे. यामध्ये कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि चंदीगड या राज्यात थंडीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान गेला आहे. तर काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे.

देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरत चालला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. डोंगराळ भागापासून ते मैदानी भागापर्यंत थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. 10 जानेवारी रोजी थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राजस्थान आणि बिहारमध्ये थंडीचा ऑरेंज अलर्ट ( Weather Update ) जारी केला आहे.

राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याचे दिसून आले आहे. अनेक भागात 10 ते 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव या ठिकाणी देखील थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये तीन दिवसापासून थंडीची लाट पसरली आहे. याचा परिणाम थेट जनसामान्याचे आरोग्यावर होत आहे. यंदाच्या मौसमत परभणीमध्ये सर्वात नीचांकी म्हणजे 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागांमध्ये देखील तापमान 8 अंश सेल्सिअस पर्यंत आले आहे. त्यामुळे गारठा वाढत चालला आहे. दुपारपर्यंत वातावरणात गारठा असल्याने परिसरातील नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button