Dipak Kesarkar | “…म्हणून तुमची आदळ आपट चालली आहे”; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

Dipak Kesarkar | मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील (Mumbai) रस्त्यांच्या कंत्राटावरुन शुक्रवारी राज्य सरकारवर टीका केली. विशिष्ट कंत्राटदारांना काम दिल्याचाही आरोप त्यांनी केला. याशिवाय लोकप्रतिनिधी नसताना टेंडर कसे निघाले, असे विविध प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारले. त्या प्रश्नांना आज उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) यांनी आदित्य ठाकरेंवर शरसंधान साधलं आहे.

“कोस्टल रोडवर मार्केट रेटच्या बरोबर रेट आणले. 12 टक्के जास्त झालं. त्यावेळी तुम्हाला हे कळलं नाही. त्याठिकाणी दर्जेदार काम व्हावं म्हणून निर्णय घेतला आहे. सगळ्यात चांगल्या एजंसीला काम दिलं. देशात सर्वोत्कृष्ट काम त्यांनी केलेली आहेत. अशाच लोकांची स्पर्धा होती. बराच वेळ ही स्पर्धा चालली. तेथे कोणीही सहभागी होऊ शकत होतं”, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

“ही कामे होऊन मुंबई खड्डेमुक्त झाली तर आमचे काय होणार. मुंबईत चांगले दवाखाने होत आहेत. ते झाले तर आमचे काय होणार. मुंबईत चांगले सौदर्यीकरण होत आहे. मुंबईतील जीवन बदलत आहे, तर आमचे काय होणार. हा विचार तुम्हाला पिळतोय. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे”. असा खोचक टोला दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :