महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार? फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळे राज्य आणि केंद्रात मोठ्या राजकीय फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे.

Published On: 

CM Fadnavis

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Political Circles) सध्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना अचानक उधाण आले आहे. दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दीड महिन्यांत राज्य आणि केंद्र अशा दोन्ही स्तरांवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. (Maharashtra Politics)

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्यांमुळे राज्य आणि केंद्र स्तरावर (State and Central Govt) होऊ घातलेल्या मोठ्या बदलांच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

दिल्लीतील सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळे केंद्र आणि राज्यात पुढील दीड महिन्यांत मोठे फेरबदल होणार आहे, असे संकेत मिळत आहेत. दिल्लीत २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल (Cabinet Expansion) होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

केंद्रातील या बदलांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवरही होण्याची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्यांमागे हा होऊ घातलेला फेरबदल हेच कारण आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांत वाढ झाली असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चाही राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र फडणवीस यांनी या शक्यतेबाबत अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? यावरून राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही