Share

‘3 Idiots’ आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही; आमीर खानचे स्पष्ट वक्तव्य

आमीर खानने स्पष्ट केले की ‘3 Idiots’मधील रँचोची व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही. तसेच सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली आहे.

Published On: 

Amir Khan

मुंबई: काही वर्षांपूर्वी ‘थ्री इडियट्स’ (3 Idiots) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोनम वांगचुक हे नाव खूप चर्चेत आले. या चित्रपटात अभिनेता आमीर खानने (Amir Khan) साकारलेले पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे, असा अनेकांचा समज होता. मात्र, आमीर खानने आता स्पष्ट केले आहे की, त्याने साकारलेल्या भूमिकेचा सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्याशी कोणताही संबंध नाही. तसेच, वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबतही त्याने आपली भूमिका मांडली आहे.

‘नीट’ (NEET) परीक्षेचा पेपरफुटीचा घोटाळा आणि परीक्षा पद्धतीत सुधारणांच्या मागणीसाठी सोनम वांगचुक २८ जूनपासून दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. या प्रकरणावर आमीर खानने भाष्य केले आहे. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल (LIFF) दरम्यान, आमीर खानने वांगचुक यांचे आंदोलन आणि त्यांच्या आरोग्याविषयी चर्चा केली, तसेच एक महत्त्वाची बाबही स्पष्ट केली.

‘थ्री इडियट्स’ प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा असा समज होता की, या सुपरहिट चित्रपटातील आमीर खानचे लोकप्रिय पात्र ‘फुंसुख वांगडू’ (किंवा ‘रँचो’) हे सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित होते. मात्र, आमीर खानने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.

“हा एक गैरसमज आहे…”

‘लगान’ (Lagaan) या चित्रपटाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त लंडनमध्ये आयोजित एका विशेष संवाद सत्रात आमीर खानला सोनम वांगचुक यांच्याबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना आमीर म्हणाला, “नाही, ते खरे नाही. याबद्दल लोकांमध्ये मोठा गैरसमज आहे. जेव्हा आम्ही ‘थ्री इडियट्स’चे चित्रीकरण करत होतो, तेव्हा आमच्यापैकी कोणालाही मला किंवा चित्रपटाचे लेखक राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी अलीकडेच ‘चतुर’ (ओमी वैद्य) याचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात त्याने तसा दावा केला होता, पण तो चुकीचा आहे.”

आमीरने पुढे स्पष्ट केले की, सोनम वांगचुक यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे नाव ‘थ्री इडियट्स’शी जोडण्याची गरज नाही. कारण ते प्रत्यक्ष जीवनात जे कार्य करत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

वांगचुक यांच्या खालावणाऱ्या आरोग्याबद्दल चिंता

परीक्षा पद्धतीत सुधारणांच्या मागणीसाठी सोनम वांगचुक २८ जूनपासून दिल्लीत जंतर मंतर येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण सुरू करून जवळपास २० दिवस झाले आहेत आणि त्यांची प्रकृती चिंतेचा विषय बनत चालली आहे. आपली चिंता व्यक्त करताना आमीर खानने म्हटले की, वांगचुक हे उदात्त हेतूने हे पाऊल उचलत आहेत. “त्यांच्या प्रकृतीबद्दल मला खूप काळजी वाटते. हे आंदोलन लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने संपेल आणि ते त्यांचे उपोषण मागे घेतील, अशी मी प्रार्थना करतो.”

हा वाद आता मिटणार का?

काही दिवसांपूर्वी, ‘थ्री इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटात ‘चतुर’ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने भावूक आवाहन करत म्हटले होते की, “मला फुंसुख वांगडूला मरू द्यायचे नाही आहे.” त्यानंतर, नेटकऱ्यांनी आमीर खानला यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची आणि या मुद्द्यावर भाष्य करण्याची विनंती केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही