Share

भारताच्या शेजारी देशात भीषण हल्ला; 45 हून अधिक जणांचा मृत्यू!

बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांवर मोठा हल्ला करून 45 हून अधिक सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे.

Published On: 

Attack

Balochistan Attack : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षेसमोर सतत आव्हाने उभी राहत आहेत. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (BLA) पाकिस्तानी सुरक्षा दलांवर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. या घटनेत ४५ हून अधिक पाकिस्तानी सैनिक (Pakistan Army) मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.

बलुचिस्तानमधील प्रवक्ते जियांद बलुच यांनी सांगितले की, ‘फतह स्क्वॉड’ने पाकिस्तानी सुरक्षा दलांवर हल्ला केला. बॉम्बस्फोटांद्वारे पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या अनेक बसेसना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंमध्ये बराच वेळ गोळीबार सुरू होता आणि त्यासोबतच बॉम्बस्फोटही झाले. यात ४५ हून अधिक लोक मारले गेले आणि अनेकजण जखमी झाले. संघर्ष अजूनही सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान सरकारकडून कोणतीही पुष्टी नाही

बलुचिस्तानच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, या घटनेबाबत सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल. तसेच यात पाकिस्तानी लष्कराचे मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी नमूद केले. बलुच गटाने केलेल्या दाव्यांना पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. यापूर्वीही, गेल्या काही महिन्यांत बलुचिस्तानमधील पाकिस्तानी लष्कर, निमलष्करी दले आणि सरकारी कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी BLA ने स्वीकारली आहे. या घटनांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर सतत ताण निर्माण झाला असून, पाकिस्तान सरकारवरील दबावही वाढला आहे.

पाकिस्तान सर्व बाजूंनी कोंडीत

पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. बलुच लष्कराकडून पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे आणि अफगाणिस्तान सीमेवरही तणाव दिसून येत आहे. याव्यतिरिक्त, संयुक्त अरब अमिराती (UAE) ने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे, तर दुसरीकडे पाक-व्याप्त काश्मीरमधील लोकांमध्येही असंतोष वाढत आहे. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात निदर्शने तीव्र झाली आहेत. वाढत्या वीज दरांमुळे आणि अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही