प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: बॉलिवूडमध्ये ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून आर. माधवनसोबत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे दीया मिर्झा. मॅडी आणि रीनाची ही जोडी आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. अनेकांना हा दीयाचा पहिला चित्रपट वाटतो, मात्र नुकत्याच दिलेल्या ‘स्क्रीन स्पॉटलाइट’ या मुलाखतीत तिने मोठा खुलासा केला आहे. मिस इंडिया आशिया पॅसिफिकचा किताब जिंकून आल्यानंतर तिला एकापाठोपाठ एक तीन चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या, ज्यात ‘ओम जय जगदीश’, ‘दीवानापन’ आणि ‘रहना है तेरे दिल में’ यांचा समावेश होता.
दीयाला तिच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर चक्क एका हॉटेलच्या लॉबीमध्ये मिळाली होती. मिस इंडिया आशिया पॅसिफिकचा मुकुट जिंकल्यानंतर ती जेव्हा घरी परतली, तेव्हा हैदराबादमधील एका हॉटेलच्या लॉबीत दिग्दर्शक अनुपम खेर आणि अभिनेता अनिल कपूर यांची तिच्यावर नजर पडली. ते तिथे एका शूटिंगसाठी गेले होते. याच भेटीत त्यांनी दीयाला ‘ओम जय जगदीश’ चित्रपटासाठी विचारणा केली. मॉडेलिंगनंतर थेट अभिनय क्षेत्रात येण्याबाबत ती सुरुवातीला साशंक होती. मात्र, या दोघांनी तिला विचार करण्यासाठी वेळ दिला आणि नंतर अनुपम खेर यांनी तिच्या पालकांची भेट घेऊन त्यांची समजूतही काढली.
‘ओम जय जगदीश’ या चित्रपटाच्या तयारीसाठी दीयाने प्रसिद्ध थिएटर दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांच्या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. त्याच दरम्यान निर्माते वाशू भगनानी यांनी तिला पाहिले आणि ‘दीवानापन’ या चित्रपटाची ऑफर दिली. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून दीया पुन्हा ‘ओम जय जगदीश’च्या तयारीला लागली होती. पण सरतेशेवटी ‘ओम जय जगदीश’मधील ती भूमिका अभिनेत्री तारा शर्मा हिने साकारली.
यानंतर वाशू भगनानी यांनीच दीया मिर्झाला ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाची ऑफर दिली. २००१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातूनच दीयाला खऱ्या अर्थाने मोठी ओळख मिळाली. सुरुवातीच्या काळात या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नव्हते, मात्र कालांतराने या प्रेमकथेला ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा प्राप्त झाला.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी आकाश चोप्राचा मोठा दावा; वैभव सूर्यवंशीला ‘या’ ३ खेळाडूंच्या जागीच मिळू शकते संधी
- लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ७ दिग्गज: टायगर श्रॉफ, सलमान खानसह कोणावर, कधी झाले हल्ले?
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; दसरा मेळाव्यातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







