दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; दसरा मेळाव्यातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, केवळ अडीच तासांत कार्यक्रम संपवून दुष्काळग्रस्तांना मदत दिली जाणार आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: महाराष्ट्रावर ओढवलेल्या दुष्काळाच्या परिस्थितीची दखल घेत एकनाथ शिंदे गटाने त्यांच्या दसरा मेळाव्यात मोठे बदल केले आहेत. नेस्को सेंटर येथे पार पडणाऱ्या या मेळाव्यावर यंदा दुष्काळाचे सावट असल्याने कार्यक्रमाचे स्वरूप बदलण्यात आले आहे.

यंदाच्या दसरा मेळाव्यात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दरवर्षी प्रमाणे होणारे सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात केवळ थेट भाषणे होणार असून, अवघ्या दोन ते अडीच तासांमध्ये हा संपूर्ण मेळावा संपवला जाणार आहे.

गेल्या वर्षी शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली होती. त्याच धर्तीवर यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने मदत दिली जाणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही