ठाणे, 17 ऑक्टोबर: ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी पूर्णेकर कुटुंबाने नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी लावून धरली. कुटुंबाच्या संतप्त भावना पाहिल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी तिथूनच थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला आणि प्रदीप यांचा मुलगा राम पूर्णेकर याचे त्यांच्याशी बोलणे करून दिले.
ठाण्यातील मानपाडा येथील कार्यालयात २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र (राजा) शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी कालच राम पूर्णेकर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिल्यांदाच सरनाईक यांनी पूर्णेकरांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने प्रताप सरनाईक यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. मीनाक्षी शिंदेंना तातडीने पदावरून हटवण्याची मागणी करत, त्या राजरोसपणे फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. "राजा शिंदेंची चौकशी केली काय? चौकशीमध्ये चहापाणी देऊन त्यांना सोडून दिले जाते. सत्ता मोठी नसून माणुसकी मोठी असते, मग शिंदे साहेब तिच्या पाठीशी का आहेत?" असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. तसेच, तुम्ही सर्वांवर ईडी लावता, मग आधी काहीच नसताना आता एवढी संपत्ती जमवणाऱ्या मीनाक्षी शिंदेंकडे एवढे पैसे कुठून आले? असा प्रश्न उपस्थित करत त्यांना आमच्यासमोर फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी राम पूर्णेकर याने दावा केला की, हत्येच्या दिवशी हेल्मेट घालून आलेला व्यक्ती दुसरा कुणी नसून राजा शिंदेच होता आणि यासंबंधीचे सर्व पुरावे आपले कुटुंब देणार आहे. यावर प्रताप सरनाईक यांनी कुटुंबाला आश्वस्त केले. तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, असे सांगत सरनाईक म्हणाले की, या हत्येने प्रत्येकाला दुःख झाले असून काहींनी यात राजकारण केले. आपण पहिल्या दिवसापासून संपर्कात आहोत, परंतु सुरुवातीचा माहोल पाहता प्रत्यक्ष भेटणे टाळले होते, असे स्पष्ट करत आपण पूर्णपणे पूर्णेकर कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही सरनाईक यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाचा आक्रोश; मीनाक्षी शिंदेला तत्काळ हटवण्याची मागणी
- बीसीसीआय निवड समिती: अजित आगरकर यांची जागा घेणार रमेश पोवार? ज्युनियर समितीसाठी डोडा गणेश शर्यतीत
- ‘भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं’; पदवीधर निवडणुकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल
Quick Answers
ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी प्रताप सरनाईक त्यांच्या घरी गेले होते.
पूर्णेकर कुटुंबीयांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र (राजा) शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत कारवाईची व चौकशीची मागणी केली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांची हत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी ठाण्यातील मानपाडा येथील त्यांच्या कार्यालयात करण्यात आली होती.
हत्येच्या दिवशी हेल्मेट घालून आलेला व्यक्ती दुसरा कुणी नसून राजा शिंदेच होता, असा दावा राम पूर्णेकर याने केला असून यासंबंधीचे सर्व पुरावे कुटुंब देणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






