‘भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं’; पदवीधर निवडणुकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान अंबादास दानवे यांनी महायुतीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला सरकारमध्ये मान नसून भाजप देईल तेच घ्यावे लागते, अशी टीका त्यांनी केली.

Published On: 

MHD LOGO

परभणी, 17 ऑक्टोबर: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी महायुतीवर, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेवर जोरदार टीका केली आहे. "सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला कोणताही मान नाही, तसेच त्यांना बोलण्याची मुभाही उरलेली नाही. भाजपकडून जे दिले जाईल, तेच त्यांना निमूटपणे घ्यावे लागते," असा टोला दानवे यांनी लगावला. परभणीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत बेबनाव असल्याची चर्चा होती. अमरावती शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बंडखोरी केल्याने, शिंदेसेनेने छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पाठिंबा काढला होता. मात्र, त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत महायुती एकत्र असल्याचे स्पष्ट केले. याच राजकीय घडामोडींवरून अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. तसेच, राष्ट्रवादीने अर्थखाते मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांचा उल्लेख 'मॅनेज लीडर' असा केला. तटकरे कधी भाजपमध्ये जातील याचा भरवसा नसल्याचेही ते म्हणाले.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरूनही दानवे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. "भाजपने तिरंगा रॅली काढली तर ती देशभक्ती ठरते, आणि अभिजीत दिपके यांनी 'तिरंगा लेके चलो' म्हटले तर ते देशद्रोही कसे होतात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंग्रजांच्या काळात तिरंगा फडकवणे जसा गुन्हा होता, तशीच परिस्थिती आता भाजपच्या काळात निर्माण झाल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. तसेच, दीपके तिरंगा घेऊन जात असतील तर समस्त देशवासीयांना त्यांच्याबद्दल अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

विधान परिषदेच्या उपसभापतींचे अधिकार कमी करण्याच्या मुद्द्यावरही दानवे यांनी भाष्य केले. उपसभापती आणि सभापती हे वैयक्तिक हेवेदावे आणि दडपशाही करण्यासाठी बैठका घेत असत, असे ते म्हणाले. त्यांचे अधिकार कमी करण्यात येऊ नयेत, मात्र त्यांनीही अशा पद्धतीने बैठका घेऊ नयेत, असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला कोणताही मान नाही तसेच बोलण्याची मुभाही उरलेली नाही, भाजपकडून जे दिले जाईल तेच त्यांना निमूटपणे घ्यावे लागते, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही