भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; मंगळवेढ्यात ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकारी फोडले

विधान परिषद आणि बँक निवडणुकांच्या तोंडावर भाजपने सोलापूरच्या मंगळवेढ्यात शिंदे गटाला मोठा धक्का दिला असून, ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकारी फोडले आहेत.

Published On: 

MHD LOGO

सोलापूर, 17 ऑक्टोबर: विधान परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असतानाही शिंदे गटाने सचिन सानप यांना पाठिंबा दिला. यातून शिंदेंनी भाजपविरोधात बंड पुकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, आता भाजपने सोलापूरच्या मंगळवेढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.

भाजपने मंगळवेढ्यात शिंदे गटाचे ५ नगरसेवक आणि तब्बल २०० पदाधिकारी फोडले आहेत. मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह हे पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासोबतच खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे आणि डीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांचाही या २०० पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा प्रवेश शिंदे गटाचे टेन्शन वाढवणारा मानला जात आहे.

यापूर्वी मंगळवेढा नगरपरिषदेतील आवताडे गट शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागातील १० सरपंच, ४० ग्रामपंचायत सदस्य, बाजार समितीचे सभापती व १७ संचालक, खरेदी-विक्री संघाचे १५ सदस्य आणि ७० सोसायटी सदस्य भाजपची वाट धरणार आहेत. बबनराव आवताडे गटाने यापूर्वी 'तीर्थक्षेत्र विकास आघाडी'च्या माध्यमातून नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती.

या राजकीय घडामोडींमुळे मंगळवेढ्यातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे. दहा महिन्यांपूर्वी आवताडे यांनी भगीरथ भालके यांच्याशी युती करत भाजपविरोधात मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. या आघाडीने नगराध्यक्षांसह एकूण ९ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, सत्ता स्थापनेनंतर काही महिन्यांतच स्वीकृत नगरसेवक आणि गटनेता निवडीवरून या आघाडीत फूट पडली व दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला होता.

त्यानंतरच्या काळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके आणि नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी आपल्या काही समर्थकांसह पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता आवताडे गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवेढ्यात शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

भाजपने मंगळवेढ्यात शिंदे गटाचे ५ नगरसेवक आणि तब्बल २०० पदाधिकारी फोडले आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही