सोलापूर, 17 ऑक्टोबर: सोलापूर येथे बोलताना आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यूनंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हे पद कधीही दिले जाणार नाही, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. मी भाजपला फार ओळखतो, त्यामुळे त्यांच्यापासून लांब असल्याचेही ते म्हणाले. गेल्या नऊ महिन्यांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांकडे या पदाची मागणी करूनही अद्याप त्यांना ते मिळालेले नाही.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी होती आणि यंदाच्या मार्च महिन्यात ते राज्याचा अर्थसंकल्प मांडणार होते. मात्र, जानेवारी महिन्यात त्यांच्या अपघाती निधनामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झाला. यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, अर्थसंकल्पाचे कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले. आज नऊ महिने उलटूनही राष्ट्रवादी काँग्रेसला हे पद परत देण्यात आलेले नाही. अजितदादांना त्यांच्याच पक्षातील आणि भाजपमधील दोन्ही नेत्यांनी न्याय दिला नसल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरूनही रोहित पवारांनी सरकारला धारेवर धरले. सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य मदत द्यावी, अन्यथा तुम्हाला दिवाळी साजरी करू देणार नाही, असा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. केवळ पाच हजारांची मदत देऊन सरकार शेतकऱ्यांना गृहीत धरत असल्याचेही त्यांनी सुनावले.
एमपीएससीच्या आंदोलनानंतर आपण मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो आणि उद्यापासून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सक्रिय होणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. एमपीएससीच्या तपासाबाबत बोलताना त्यांनी तुकाराम मुंढे आणि चौकशी समितीवर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट केले. काही विद्यार्थी मुंढेंची भेट घेऊन त्यांना पुरावे देतील, ज्यामुळे सर्व गोष्टी लवकरच उघड होतील. नव्याने नियुक्त झालेल्यांची आपण पार्श्वभूमी तपासली असून अध्यक्षांबाबत काहीही नकारात्मक आढळले नाही, मात्र तपास करून कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- SA vs AUS 2nd Test: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीची ड्रीम 11 टीम आणि पिच रिपोर्ट
- बीसीसीआयच्या निवड समितीने यशस्वी जैस्वालचा आत्मविश्वास उद्ध्वस्त केला; आर. अश्विनचा गंभीर आरोप
- २०२७ च्या वर्ल्ड कप प्लॅनमधून रवींद्र जडेजा बाहेर? न्यूझीलंड दौऱ्यासाठीही संघातून वगळले
Quick Answers
दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यूनंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरले असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हे पद कधीही दिले जाणार नाही, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
अर्थसंकल्पाचे कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले.
केवळ पाच हजारांची मदत देऊन सरकार शेतकऱ्यांना गृहीत धरत असून, सरकारने लवकरात लवकर योग्य मदत द्यावी अन्यथा दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.
एमपीएससीच्या तपासाबाबत बोलताना त्यांनी तुकाराम मुंढे आणि चौकशी समितीवर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट केले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






