प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवल्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी आयोगातील आणखी एका सदस्यावर निशाणा साधला आहे. 'विद्यमान सदस्य अभय वाघ हे मोठे खिलाडी असून त्यांनाही भीमनवार यांच्याप्रमाणे रजेवर पाठवावे', अशी मागणी त्यांनी केली आहे.
एमपीएससीमधील तक्रारींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार असून, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीत तुकाराम मुंढे यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली असून, निवृत्त आयएएस गणेश पाटील आणि आयपीएस लखमी गौतम यांचाही समावेश आहे. या चौकशीमुळे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार सध्या रजेवर आहेत. त्यांच्या जागी सतीश वाघोले यांच्याकडे आयोगाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
या घडामोडींवर आमदार रोहित पवार यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी 'एक्स'वर सविस्तर भूमिका मांडली. 'कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अॅक्ट-१९५२' अंतर्गत स्थापन झालेल्या या न्यायिक आयोगामुळे शिपायापासून ते अध्यक्षांपर्यंत सर्वांची चौकशी होऊन आयोगाचे संपूर्ण शुद्धीकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३१७ च्या पुढील कारवाईसाठी शिफारस होईल अशी अपेक्षा व्यक्त करत, औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसह गट ब, गट क आणि इतर संशयित परीक्षांचीही चौकशी होणार असल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सरकारने लक्ष घालावे आणि अभय वाघ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पवारांनी केली आहे. 'गट ब' परीक्षेच्या संदर्भात पुढच्या आठवड्यात ते न्यायिक आयोगाला भेटणार आहेत. विद्यार्थ्यांनी शक्य तेवढे सर्व पुरावे आपल्याकडे किंवा विद्यार्थी प्रतिनिधींकडे जमा करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. "एकही दोषी सुटणार नाही याची आपण काळजी घेऊ. जब तक घर भेजेंगे नहीं… तब तक छोड़ेंगे नहीं…!" असा इशाराही पवार यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Delhi CJP Protest : सीजेपीच्या तिरंगा रॅलीत अभिजीत दीपके ताब्यात; व्यापाऱ्यांची मोदी आणि निवडणूक आयुक्तांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
- विधान परिषद निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का; पुणे जागेच्या रस्सीखेचीनंतर शिंदे गटाकडून मोठी घोषणा
- BAN vs ZIM 1st ODI: बांगलादेश-झिम्बाब्वे त्रिकोणी मालिकेत आमनेसामने; खेळपट्टी, हवामान आणि संभाव्य प्लेइंग 11
Quick Answers
आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीचे विद्यमान सदस्य अभय वाघ यांच्यावर निशाणा साधला. अभय वाघ हे मोठे खिलाडी असून त्यांनाही भीमनवार यांच्याप्रमाणे रजेवर पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एमपीएससीमधील तक्रारींची चौकशी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. डी. नाईक सदस्य आहेत, तुकाराम मुंढे सदस्य सचिव आहेत, तसेच निवृत्त आयएएस गणेश पाटील आणि आयपीएस लखमी गौतम यांचाही समावेश आहे.
विवेक भीमनवार रजेवर असल्यामुळे सतीश वाघोले यांच्याकडे आयोगाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








