मुंबई, 11 ऑक्टोबर: पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेले आंदोलन हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा ‘लॉन्चिंग प्रोग्राम’ आहे, अशी जोरदार टीका भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा महायुती सरकारला लक्ष्य करण्याचा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला.
बन म्हणाले की, या आंदोलनामध्ये रोहित पवार यांचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे आपण सुरुवातीपासून सांगत आहोत. रोहित पवार यांना मुख्यमंत्री करा, अशा घोषणाही तिथे दिल्या जात आहेत. आपला हरवलेला जनाधार परत मिळवण्यासाठीच पवार हे आंदोलन करत आहेत. आंदोलनात पवार यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून, आज यासंदर्भातील चौथी व्हिडिओ सीरिज दाखवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ २० टक्के असून, बारामती ॲग्रोशी संबंधित लोकांना तिथे बोलावले जात असल्याचा दावा बन यांनी केला. रोहित पवारांनी राजकीय आंदोलन जरूर करावे, पण मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये. विद्यार्थ्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करू नये, असे बन यांनी सुनावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, मग हे आंदोलन नेमके कशासाठी सुरू आहे, असा प्रश्न बन यांनी विचारला. आंदोलनासाठी योग्य परवानगी घेणे आवश्यक असून सार्वजनिक शांतता भंग करू नये. शिवाजी पार्क परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असून, तेथील नागरिकांनीही शांतता भंग करू नये अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. एलॉन मस्क यांच्याबाबत बोलण्यापेक्षा अशा विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. देश स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा असल्याचे सांगत, उद्धव ठाकरेंवर टीका करताना १०० कोटींच्या वसुली प्रकरणासह सचिन वाझे यांच्याविषयीच्या जुन्या विधानाचा त्यांनी संदर्भ दिला.
गुरुद्वारामधील एका घटनेचा व्हिडिओ पाहिला असून, काही लोक थेट गुरुद्वारात घुसल्याचे दिसत असल्याचा दावा करत बन यांनी संबंधित लोकांवर गंभीर आरोप केले. याबाबत अधिक माहिती घेऊन बोलणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यासह विरोधकांनी आपापले व्यवसाय सांभाळावेत असा सल्ला देत, नवी मुंबईतून येऊन पत्रकार परिषद घेणाऱ्या गजानन काळेंच्या राजकीय भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ३५ वर्षे वेगळे राहूनही नाना पाटेकरांनी पत्नी नीलकांती यांना का दिला नाही घटस्फोट? मनीषा कोईरालालाही यासाठीच सोडले
- ‘अटक नव्हे, माझे अपहरण झाले होते’: ध्रुव राठीचे गुरुग्राम पोलिसांवर गंभीर आरोप; मध्यरात्रीनंतर सुटका
- कोणालाही न सांगता गुपचूप परदेशवारी करायचे नाना पाटेकर; सोनाली कुलकर्णीने उलगडले अज्ञात पैलू
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









