शरद पवार गट एनडीएमध्ये गेल्यास रोहित पवारांची स्वतंत्र रणनीती? पक्ष नेतृत्वाशिवाय मोर्चेबांधणीला सुरुवात

शरद पवार गट एनडीएमध्ये गेल्यास रोहित पवार काँग्रेस विचारांच्या नेत्यांना सोबत घेऊन स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published On: 

Rohit Pawar raised question on INDIA Alliance in Delhi Election

प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत (NDA) सहभागी झाल्यास, रोहित पवार यांच्याकडून स्वतंत्र रणनीतीची चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, यासाठी पक्ष नेतृत्वाला विश्वासात घेण्यात आलेले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, जर शरद पवार गटाने एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्यासोबत न जाणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची रोहित पवारांकडून जुळवाजुळव सुरू आहे. काँग्रेस विचारांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्यासोबत जोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून, ते काँग्रेससोबत जाण्याच्या किंवा स्वतंत्र भूमिका घेण्याच्या पर्यायांवर विचार करत आहेत.

या रणनीतीचा भाग म्हणून रोहित पवारांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या टीमकडून संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांची एक यादीही तयार करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत, आवश्यकता भासल्यास सोबत येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीच्या तिकिटांचे आश्वासन देण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे समजते. शरद पवार गटाच्या संभाव्य एनडीए प्रवेशानंतर स्वतःची राजकीय बाजू भक्कम करण्यासाठी रोहित पवारांकडून ही तयारी केली जात असल्याचे मानले जात आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही