मुंबई, 17 ऑक्टोबर: आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून काही मंत्र्यांच्या सुमार कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज आहेत. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी तरुण आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.
सध्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडे आरोग्य, पाणीपुरवठा, सामाजिक न्याय आणि शिक्षण यांसारखी अत्यंत महत्त्वाची खाती आहेत. वरिष्ठ मंत्र्यांना आतापर्यंत पुरेशी संधी देण्यात आली असली तरी या खात्यांचे कामकाज अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे समोर आले आहे. सरकारच्या एकूण कामकाजात अपेक्षित प्रगती दिसत नसल्याने आता नवीन आणि तरुण चेहऱ्यांना पुढे आणण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे समजते.
या संभाव्य बदलांमध्ये काही कार्यक्षम तरुण आमदारांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच, विद्यमान राज्यमंत्र्यांची कामगिरी तपासून त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त काही नव्या आमदारांकडे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाण्याचीही चर्चा आहे. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर होत असलेले हे फेरबदल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, नेमकी कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जेक फ्रेझर-मॅकगर्कचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये इतिहास; केवळ १४ चेंडूत झळकावले सर्वात वेगवान अर्धशतक
- आयपीएल २०२७ पूर्वी महेला जयवर्धने यांचा राजीनामा; मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकांसाठी नावांची शॉर्टलिस्ट
- अटकेनंतर अभिजीत दिपकेंना रामदास आठवलेंची पुन्हा मोठी ऑफर; थेट RPI मध्ये येण्याचे निमंत्रण
Quick Answers
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून काही मंत्र्यांच्या सुमार कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज आहेत.
मंत्रिमंडळात शिवसेनेकडे आरोग्य, पाणीपुरवठा, सामाजिक न्याय आणि शिक्षण यांसारखी महत्त्वाची खाती आहेत.
अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन काही कार्यक्षम तरुण आमदारांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच, विद्यमान राज्यमंत्र्यांची कामगिरी तपासून त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती दिली जाऊ शकते आणि काही नव्या आमदारांकडे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






