धाराशिव, 17 ऑक्टोबर: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत आंदोलनाची हाक देणारे कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अभिजीत दिपके यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिपके यांना पुन्हा एकदा मोठी राजकीय ऑफर दिली असून, त्यांना थेट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (RPI) सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे.
निवडणूक आयुक्तांच्या विरोधात सीजेपीसह विरोधी पक्षांकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले जात आहे. काल दिल्लीत तिरंगा आंदोलनाची हाक दिल्यानंतर, आंदोलनापूर्वीच दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या धाराशिवच्या दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांनी या घडामोडींवर भाष्य केले. 'जो जायेगा जंतर-मंतर, हो जायेगा अंदर', अशी कविताही आठवले यांनी यावेळी ऐकवली. काँग्रेसचे सरकार असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आपल्यालाही अनेकदा अटक झाल्याचे त्यांनी नमूद केले. जंतर-मंतरकडे जाण्याच्या प्रयत्नामुळेच दिपकेंवर अटकेची कारवाई झाल्याचे ते म्हणाले.
यानंतर बोलताना आठवले यांनी दिपके यांना पक्षात येण्याची थेट ऑफर दिली. "दिपके खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी असतील, तर त्यांनी देशातील तरुणांना सोबत घेऊन आरपीआयमध्ये यावे. ज्ञानेश कुमार यांच्या मागे लागण्यापेक्षा आमच्या पक्षात येऊन संविधानिक मागण्यांसाठी आंदोलन करावे," असे आठवले म्हणाले. पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर दिपके या ऑफरवर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
याच दौऱ्यात आठवले यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबाबतही भूमिका मांडली. दिवाळीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी असल्याच्या तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असल्याने, त्यांना ५ हजारांऐवजी १५ हजार रुपये वाढीव मदत मिळावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकरी आणि शेतमजुरांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी चांगली आर्थिक मदत देण्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजू सॅमसनला डावलून भारतीय संघात संधी मिळालेला कुमार कुशाग्र कोण आहे?
- संघाच्या विजयादशमी सोहळ्याला इस्रायलचे महावाणिज्यदूत आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राहणार उपस्थित
- न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांची होणार ‘मॅच सिम्युलेशन’ चाचणी
Quick Answers
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत तिरंगा आंदोलनाची हाक दिली होती. जंतर-मंतरकडे जाण्याच्या प्रयत्नामुळे आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
रामदास आठवले यांनी अभिजीत दिपके यांना थेट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (RPI) सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. दिपके आंबेडकरवादी असतील तर त्यांनी तरुणांना सोबत घेऊन आरपीआयमध्ये यावे आणि संविधानिक मागण्यांसाठी आंदोलन करावे, असे आठवले म्हणाले.
दिवाळीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी असून, त्याऐवजी १५ हजार रुपये वाढीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






