दिल्ली, 18 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) अध्यक्ष अभिजीत दिपके यांची २४ तासांच्या कोठडीनंतर सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. तुरूंगातून बाहेर पडताच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या 'पठाण' चित्रपटातील लूकचा फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. इंटरनेट आणि फोनशिवाय राहण्याचा अनुभव सांगणारी त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात शुक्रवारी सीजेपीने 'लहरा दो तिरंगा' मार्चची हाक दिली होती. पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. तरीही दिपके यांनी आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत करोल बाग येथील निवासस्थानातून अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांना ताब्यात घेतले होते.
अटकेनंतर पोलिसांनी दिपके यांना गुप्त ठिकाणी ठेवल्याचा आरोप सीजेपीने केला होता. त्यानंतर त्यांना अटक झाल्याची माहिती समोर आली. शनिवारी पोलिसांनी त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने एका वर्षासाठी शांतता राखण्याच्या हमीवर दिपके यांना सशर्त जामीन मंजूर केला.
जामीन मिळाल्यानंतर १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिपके यांनी आपल्या एक्स हँडलवरून जेन झी (Gen Z) पिढीचा उद्वेग मांडला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “२४ तास कोणतेही वायफाय आणि फोनशिवाय तुरूंगातून बाहेर पडताना नेमके कसे वाटते…” या गमतीशीर पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मूलभूत अधिकारांसोबतच इंटरनेटचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.
सीजेपीने १० ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून विविध कलमे आणि नियमांचे कारण देत हे आंदोलन हाणून पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जंतरमंतर येथे आंदोलन केल्याचा ठपका ठेवत यापूर्वीच सीजेपीचे सदस्य आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांच्या कोठडीसह तिहार तुरूंगात पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईवरून सीजेपीने आता केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बावनकुळे साहेब, प्रॉपर्टीची चौकशी झाल्यास विदेशात पळावे लागेल; हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
- भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन, तरीही मोहम्मद शमीला का डावलले? फिटनेस ठरतोय मुख्य अडथळा
- एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवीला गाऱ्हाणं; शिंदेंची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत
Quick Answers
न्यायालयाने एका वर्षासाठी शांतता राखण्याच्या हमीवर अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
पोलिसांनी करोल बाग येथील निवासस्थानातून अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांना ताब्यात घेतले होते.
तुरूंगातून बाहेर पडताच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अभिनेता शाहरूख खानच्या 'पठाण' चित्रपटातील लूकचा फोटो शेअर करत २४ तास वायफाय आणि फोनशिवाय राहण्याचा अनुभव सांगणारी पोस्ट लिहिली.
सीजेपीने दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात शुक्रवारी 'लहरा दो तिरंगा' मार्चची हाक दिली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






