प्रतिनिधी, 18 ऑक्टोबर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'बावनकुळे साहेब, तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावे लागेल,' असा खोचक टोला सपकाळ यांनी लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काल अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी, शिक्षकांना धमकावले गेल्यास एसआयटी (SIT) मार्फत चौकशी केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत सपकाळ यांनी पलटवार केला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाची कास धरत बहुजन समाजाला शिकवले आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्याच श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये एसआयटी लावण्याची भाषा करणे हा संपूर्ण विदर्भाचा अपमान आहे. हा अपमान आपण सहन करायचा का? असा संतप्त सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.
बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करताना सपकाळ म्हणाले की, विदेशातील क्लबमध्ये जाऊन सुटकेस भरून कोट्यवधी रुपयांची तुम्ही 'एका-दुरी' खेळता. हा पैसा कुठून आला? याचे उत्तर द्यावे लागल्यास तुम्हाला घाम फुटेल. शिवाजी शिक्षण संस्थेमागे एसआयटी लावण्याची भाषा करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला.
📌 महत्वाच्या बातम्या
- भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन, तरीही मोहम्मद शमीला का डावलले? फिटनेस ठरतोय मुख्य अडथळा
- एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवीला गाऱ्हाणं; शिंदेंची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत
- अर्थखात्याची एवढीच चिंता असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात जावं; भाजपचा हल्लाबोल
Quick Answers
हर्षवर्धन सपकाळ यांनी, 'बावनकुळे साहेब, तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावे लागेल,' असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.
शिक्षकांना धमकावले गेल्यास एसआयटी (SIT) मार्फत चौकशी केली जाईल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये एसआयटी लावण्याची भाषा करणे हा संपूर्ण विदर्भाचा अपमान आहे, असा आक्षेप हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला.
सपकाळ यांच्या आरोपानुसार, बावनकुळे विदेशातील क्लबमध्ये जाऊन सुटकेस भरून कोट्यवधी रुपयांची 'एका-दुरी' खेळतात आणि हा पैसा कुठून आला याचे उत्तर द्यावे लागल्यास त्यांना घाम फुटेल.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






