अर्थखात्याची एवढीच चिंता असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात जावं; भाजपचा हल्लाबोल

रोहित पवारांना अर्थखात्याची काळजी असेल तर त्यांनी स्वर्गीय अजितदादांच्या पक्षात जावे, असा टोला भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी लगावला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: महायुतीच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर बोलण्याचा आमदार रोहित पवार यांना काय अधिकार आहे, असा खडा सवाल भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवारांना अर्थखात्याची एवढीच चिंता असेल, तर त्यांनी शरद पवारांचा पक्ष सोडून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा, असा टोला कुलकर्णी यांनी लगावला. रोहित पवारांचा स्वभाव म्हणजे ताजमहालावर टावेल वाळू घालण्यासारखा असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाने भाजपकडे अर्थखाते परत देण्याची मागणी केली आहे. यावर रोहित पवारांनी सुनेत्रा पवार गटाला सतर्क करताना स्पष्ट केले की, भाजपकडून हे खाते कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडेच ठेवले. यावर संताप व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले, "अजितदादा गेल्यानंतर भाजपने हावरटासारखे अर्थखाते चोरून घेतले आणि अद्याप दिलेले नाही. ते आता देणारही नाहीत."

सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महायुतीत अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे. याच दरम्यान झालेल्या महायुतीच्या बैठकीत सुनेत्रा पवार गटाचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी अर्थखात्यासाठी पुन्हा मागणी केली. अजित पवार यांच्या निधनाला नऊ महिने उलटून गेल्यानंतर टिंगरे यांनी हे नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वीही हे खाते मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या, मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू शकला नव्हता.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले की, रोहित पवारांना जर अर्थखात्याची एवढीच चिंता असेल, तर त्यांनी शरद पवारांचा पक्ष सोडून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही