प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: निवडणुका आणि आंदोलनांच्या माध्यमातून मत व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेतला जात असेल, तर अशी राजवट उलथवून टाकण्यासाठीच आम्ही उभे आहोत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी भाजपच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांना उद्देशून ठाकरे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला. दिल्लीत हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत, ते काय नवरात्रीत दांडिया खेळण्यासाठी आणले आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली. विद्यार्थ्यांची डोकी फोडली जात आहेत, तरुण-तरुणींना फरफटत नेऊन अमानुष मारहाण केली जात आहे. कपडे फाडण्याचा आणि केस ओढण्याचा हा जो प्रकार सुरू आहे, तो तुमचा दांडिया आहे का? अशी दडपशाही करणारी राजवट गाडलीच पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
लोकशाही वाचवण्याची जबाबदारी कोणा एका व्यक्तीची किंवा लेखणीची नाही, असे सांगताना त्यांनी 'गोवर्धन' पर्वताचा दाखला दिला. ज्याप्रमाणे सर्वांनी काठ्या आणि बोटं लावून गोवर्धन उचलला, त्याचप्रमाणे सर्वांनी मिळून लोकशाहीचा गोवर्धन या पुरापासून वर काढला पाहिजे, अन्यथा सगळेच बुडून जातील, असा इशारा त्यांनी दिला. डोळ्यांसमोर देशाची वाट लागत असताना आपण गप्प बसणार असू, तर आपल्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी, असे उद्विग्न उद्गारही त्यांनी काढले.
याआधी वकील प्रशांत भूषण आणि आयसा (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांनी 'राजवट बदलण्याबाबत' केलेल्या वक्तव्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार आणि एसआयआर (SIR) यांच्या विरोधात 'इंडिया' आघाडी आणि सीजेपीकडून (CJP) सुरू असलेल्या आंदोलनामागे देशात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
विरोधक डंके की चोटवर सरकार पाडण्याची भाषा करत आहेत. 'सत्तापालट' यांसारखे शब्द वापरले जात असल्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांचा लढा निवडणूक सुधारणा, एसआयआर, ज्ञानेश कुमार किंवा तरुणांच्या भविष्यासाठी नाही. लोकशाही संस्था नष्ट करून आणि देशात अराजकता माजवून सत्ता मिळवणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा असल्याची घणाघाती टीका राजनाथ सिंह यांनी केली होती. याच आरोपांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर बाळासाहेब वर्षावर गेले होते; मैत्री आणि मतभेदांच्या उद्धव ठाकरेंनी सांगितल्या आठवणी
- एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय बच्चू कडू यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; अमरावती जिल्हा बँकेतील दावा फेटाळला
- कार्यक्षेत्राबाहेर कारवाई करणाऱ्या FDA अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार; मंत्री नरहरी झिरवाळांचा इशारा
Quick Answers
उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना प्रत्युत्तर दिले.
दिल्लीत तैनात केलेले हजारो पोलीस नवरात्रीत दांडिया खेळण्यासाठी आणले आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी 'गोवर्धन' पर्वताचा दाखला दिला. ज्याप्रमाणे सर्वांनी काठ्या आणि बोटं लावून गोवर्धन उचलला, त्याचप्रमाणे सर्वांनी मिळून लोकशाहीचा गोवर्धन या पुरापासून वर काढला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआर यांच्या विरोधातील आंदोलनामागे देशात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा, तसेच लोकशाही संस्था नष्ट करून आणि अराजकता माजवून सत्ता मिळवणे हाच विरोधकांचा अजेंडा असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला होता.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







