प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षण संस्थाचालकांना कडक इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळून शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपल्यास संबंधित संस्थाचालकांची एसआयटी (SIT) चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, विशिष्ट उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी दिल्यास त्या संस्थेची थेट मान्यताच रद्द केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या संदर्भात ते बोलत होते. आगामी २३ तारखेला होणारी निवडणूक संकल्पपूर्तीकडे घेऊन जाणारी असून, राज्यातील पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे बावनकुळे म्हणाले. शिक्षकांचे मूळ प्रश्न सोडवण्याची ताकद किरण सरनाईक यांच्यात असून, निवडून आल्यावर ते दादा भुसे आणि महायुतीच्या इतर नेत्यांकडून कामे पूर्ण करून घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विदर्भात महायुती मजबूत असून, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोणताही नेता किंवा कार्यकर्ता महायुतीच्या विरोधात काम करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात गैरसमज पसरवले जातात, जसे की अनिल बोंडे बहिणीचे किंवा राजेश वानखेडे मेहुण्याचे काम करत आहेत. मात्र, कुणाबद्दलही गैरसमज करू नये आणि कुणाचीही नार्को टेस्ट करण्याची गरज नाही, सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. विधानसभेत २८८ पैकी २३२ आमदार असल्याने आपले सरकार भक्कम असल्याचा दावाही त्यांनी केला.
निवडणुकीसोबतच दुष्काळ निवारणाचे कामही प्राधान्याने करावे लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्नाटकमधील मदतीवरून आरडाओरड करणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी यावेळी टीका केली. काही राजकारणी लोक निवडणुकांसाठी शिक्षण संस्थांचा वापर करत असल्याचा आरोप करत, आगामी काळात महानगरपालिकेच्या शाळा खाजगी शाळांपेक्षाही अधिक चांगल्या करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डी. लिट.’ ने होणार सन्मानित; अदाणी इन्स्टिट्यूटचा १७ वा दीक्षांत समारंभ
- अभिजीत दिपके यांना दिल्लीत पुन्हा अटक; मध्यरात्री नेहा बोरांची सुटका, घडामोडींना वेग
- उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी; पण पालिकेच्या २४ कठोर अटी लागू
Quick Answers
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळून शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपल्यास संस्थाचालकांची एसआयटी (SIT) चौकशी केली जाईल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. तसेच विशिष्ट उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी दिल्यास त्या संस्थेची मान्यता थेट रद्द केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक हे आहेत.
विधानसभेत २८८ पैकी २३२ आमदार असल्याने आपले सरकार भक्कम असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






