पुणे शिक्षक मतदारसंघ: शिवसेनेचा अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा, भाजप-शिंदे गट आमनेसामने

पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना अधिकृत पाठिंबा दिला असून, यामुळे भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 16 ऑक्टोबर: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने अधिकृत पत्र काढून सानप यांना पुरस्कृत केल्याचे स्पष्ट केले आहे. या राजकीय घडामोडीमुळे पुणे शिक्षक मतदारसंघात आता भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या जागेसाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे.

यापूर्वी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मंगेश चिवटे यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी करत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पक्षाने त्यांना एबी फॉर्मही दिला होता. मात्र, युतीधर्माचे पालन करण्यासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असलेल्या सचिन सानप यांनी 'शिक्षक मतदारसंघाचा आमदार शिक्षकच हवा' अशी भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

चिवटे यांच्या माघारीनंतर या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काल शिंदे यांनी सानप यांना पाठिंबा दर्शवला होता, तर आज शिवसेनेकडून सानप हे पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. सानप यांना मिळालेल्या या पाठिंब्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली असून, खुद्द एकनाथ शिंदे १८ तारखेला अमरावती दौऱ्यावर जाऊन निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघात आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर रिंगणात आहेत, तर माजी आमदार दत्तात्रय सावंत हे अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. भाजपकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून सचिन सानप अशी ही लढत रंगणार आहे. याआधी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयंत आसगावकर यांनी भाजपच्या जितेंद्र पवार यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही