मुंबई, 14 ऑक्टोबर: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतची राजकीय अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत घेण्यावर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचेच घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मैत्रीपूर्ण लढतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे. तर दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महायुतीतील इतर मित्रपक्ष हे कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी उभे राहणार असून त्यांना अधिकृत पाठिंबा देणार आहेत. या निर्णयामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक वेळापत्रकानुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२६ असून, ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या सर्व जागांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
या निवडणुकीत एकूण पाच मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद पदवीधर (माजी आमदार सतीश भानुदास चव्हाण, शरद पवार गट/मविआ), पुणे पदवीधर (माजी आमदार अरुण गणपती लाड, शरद पवार गट/मविआ) आणि नागपूर पदवीधर (माजी आमदार अभिजीत गोविंदराव वंजारी, काँग्रेस) या तीन पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, अमरावती शिक्षक (माजी आमदार किरण रामराव सरनाईक, शिवसेना शिंदे गट) आणि पुणे शिक्षक (माजी आमदार जयंत दिनकर आसगावकर, काँग्रेस) या दोन शिक्षक मतदारसंघांसाठीही ही निवडणूक पार पडत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत; राज्यात आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
- पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिन सानपांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी
- ५ महिन्यात ३ मंत्र्यांचे राजीनामे… दोघांचं तिकीट कापलं; मोदी सरकारचा नवा डाव काय?
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








