प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: मोदी सरकारमध्ये गेल्या ५ महिन्यांत तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, तर दोन मंत्र्यांचे राज्यसभेचे तिकीट कापण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एल. मुरुगन यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच पानांचे पत्र लिहून राजीनामा सादर केला असून, हे पत्र त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतमाता आणि तामिळनाडूची सेवा करणे हा सन्मान असल्याचे नमूद करत त्यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेल्या मुरुगन यांना तामिळनाडूत पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे.
पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत मुरुगन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मंत्रिपद आणि राज्यसभा सदस्यत्वातून मुक्त करण्यासाठी मी पंतप्रधानांना विनंती केली होती. मला तामिळनाडूतील गावोगावी आणि गल्लोगल्ली जाऊन पक्ष वाढवायचा आहे. २०२९ च्या निवडणुकीसाठी मला पायाभरणी करायची आहे,” असे ते म्हणाले.
मुरुगन यांच्याशिवाय इतरही काही नेत्यांचे राजीनामे मोदी सरकारमध्ये झाले आहेत. यापूर्वी जॉर्ज कुरिअन यांनी मंत्रिपद सोडले होते, तर भाजपचे राज्यसभा खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला. तसेच, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
दुसरीकडे, भाजपने राज्यसभेतील काही विद्यमान मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी न दिल्याने आणखी पदे रिक्त होणार आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांना भाजपने राज्यसभेचे तिकीट दिलेले नाही. हे दोन्ही नेते सध्या मंत्रिमंडळात असले, तरी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपताच त्यांना आपोआप मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
या सर्व घडामोडींमुळे मोदी सरकारमध्ये सध्या पाच ते सहा जागा रिक्त झाल्या असून, केवळ विस्तारच नाही तर मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२९ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तरुण चेहऱ्यांना अधिक संधी देण्यावर, तसेच सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखण्यावर सरकारचा भर असेल. विस्ताराची वेळ अद्याप गुलदस्त्यात असून भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात मोदी कोणता नवा डाव टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पीएम मोदींचे सलग १० कॉल, पण मी उचललेच नाही”; ओडिशाच्या नवनिर्वाचित राज्यपालांनी सांगितला तो रंजक किस्सा
- अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची खोचक टीका
- आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची जेलमध्ये रवानगी; कारवाईनंतर अभिजीत दिपकेंचा मोदींना थेट इशारा
Quick Answers
एल. मुरुगन यांना तामिळनाडूत पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे. तामिळनाडूमधील गावोगावी जाऊन २०२९ च्या निवडणुकीसाठी पक्षाची पायाभरणी करायची असल्याने त्यांनी मंत्रिपद आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
मुरुगन यांच्यापूर्वी जॉर्ज कुरिअन यांनी मंत्रिपद सोडले होते, रवनीत सिंग बिट्टू यांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला, तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
भाजपने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांना राज्यसभेचे तिकीट दिलेले नाही.
२०२९ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तरुण चेहऱ्यांना अधिक संधी देण्यावर, तसेच सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखण्यावर सरकारचा भर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








