पुणे, 5 ऑक्टोबर: पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये कोणतीही बंडखोरी झालेली नाही. माजी आमदार शरद लाड यांनी भरलेला उमेदवारी अर्ज हा केवळ ‘डमी’ असल्याचे स्पष्ट करत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंडखोरीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी सोमवारी पुण्यातील विधान भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी डॉ. जाधव यांनी भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला. पक्षाच्या विकासगंगेत खारीचे योगदान देण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे भावूक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
महायुतीकडून दोन्ही मतदारसंघांत उच्चशिक्षित उमेदवार दिल्याचे रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले. डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव असून, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या सरकारशी उत्तम समन्वय साधू शकतील, असे ते म्हणाले. तर, कौस्तुभ गावडे हे अनेक वर्षांपासून शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे तरुण कार्यकर्ते असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
उमेदवारीवरून नाराज असलेल्या इच्छुकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी भरलेले अर्ज हे आम्हीच ‘डमी’ म्हणून दाखल करायला सांगितले होते, असे चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी पार पाडतील, असा दावा त्यांनी केला. पुणे, नागपूर आणि अमरावतीतील जागांवर महायुतीचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाव गडगडल्याने शेतकऱ्याने तीन एकर उभ्या कोबीवर फिरवला रोटावेटर
- निवडणूक आयोगाच्या कामकाजावर माजी न्यायमूर्ती नरीमन यांची गंभीर चिंता; ‘एसआयआर’ प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न
- नरेंद्र मोदी जानेवारीनंतर सत्तेत नसतील; संजय राऊतांचा भाजपसह एकनाथ शिंदेंवर घणाघात
Quick Answers
माजी आमदार शरद लाड यांनी भरलेला उमेदवारी अर्ज हा केवळ ‘डमी’ अर्ज असल्याचे सांगत भाजपमध्ये कोणतीही बंडखोरी झालेली नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले.
पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी पुण्यातील विधान भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी पार पाडतील, असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









